Lumpy skin Disease : राज्यात पुन्हा लम्पी स्कीन आजारानं (Lumpy skin Disease) डोकं वार काढलं आहे. त्यामुळं राज्यातील पशुपालक चिंतेत आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरानी लम्पी स्कीन आजाराची लागण होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 413 गावातील जनावरांनी लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे.  जिल्ह्यात सध्या 930 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा लम्पिबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. लम्पिग्रस्त जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.


जिल्ह्यात 413 गावातील 930 जनावरांना लम्पीची लागण 


लसीकरणामुळे कमी झालेला जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात 413 गावातील 930 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील काही जनावरे गंभीर अवस्थेत असल्याची माहिती देखील मिळाली आहे. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळं अहमदनगर जिल्हा लम्पिबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच लम्पिग्रस्त जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.


पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी


लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरू केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली आहे. पावसाळा सुरू झाला तसा, 15 जूननंतर लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढता वाढू लागला आहे. पावसाळ्यात कीटक, चिलटे, डास माशांचे प्रमाण वाढू लागले तसे जनावरातील लम्पीचा आजार बळावत चालला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: