Dr Sujay Vikhe Vs Nilesh Lanke: मागील अनेक वर्षांपासून दुष्टचक्रात अडकलेल्या अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून अहिल्यानगरच्या आजी माजी खासदारांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. जनतेचं कंबरडं मोडलं जात असताना अहिल्यानगरच्या आजी माजी खासदारांमध्ये क्रेडिटवरून एकमेकांविरोधात तोफ डागली आहे.
नगर- मनमाड रस्त्याचाही प्रश्न सुटायला हवा होता (Ahilyanagar Manmad highway)
माजी खासदार सुजय विखे म्हणाले की, काही लोक असं भाषवत होते की, माझ्या उपोषणानंतरच नगर-पाथर्डी महामार्गाचे काम पूर्ण झालं. त्यांच्या उपोषणानंतर नगर- मनमाड रस्त्याचाही प्रश्न सुटायला हवा होता, असं म्हणत नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंनी विद्यमान खासदार निलेश लंकेंवर टीकास्त्र डागलं. खासदार निलेश लंके यांनी केलेल्या सुजय विखे यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही या विभागाचे सहा वर्षे खासदार होते आता मी एक वर्षांपासून खासदार झालो आहे, तरी मी या रस्त्यांसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्र्यांना भेटलो. या महामार्गाचे काम करणारे ठेकेदार बदलले. आता रस्त्याचे काम सुरू झाले आहे, हे काम माझ्याच कार्यकाळात सुरू झाले आणि पूर्णही माझ्याच कार्यकाळात होईल असं म्हणत खासदार निलेश लंके यांनी सुजय विखेंना प्रत्युत्तर दिलं. दुसरीकडे, या महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यलयात भेट दिली. यावेळी राहुरी ते राहुरी फॅक्टरी आणि राहुरी ते राहुरी कृषी विद्यापीठ या भागातील रस्त्याचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
नगर- मनमाड महामार्गावर शिर्डी आणि शनिशिंगणापूर (Ahilyanagar News)
नगर- मनमाड महामार्गावर शिर्डी आणि शनिशिंगणापूर हे जागतिक दर्जाचे दोन तीर्थक्षेत्र आहेत. लाखो भाविकांचा खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास सुरु आहे. त्यातल्या त्यात राहुरी ते अहिल्यानगर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने पायी चालण्याचीही सोय राहिलेली नाही. त्यामुळे राहुरी ते अहिल्यानगर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, राजकारण्याच्या राजकारणात जनतेचे मात्र यात हाल होताना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या