श्रीरामपूर/अहिल्यानगर: श्रीरामपूर येथून एक धक्कादायक (Ahilyanagar Crime News) बातमी समोर आली आहे. काॅंग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून त्यांना मारहाण (Ahilyanagar Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. श्रीरामपूर येथील काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना बेदम  मारहाण करण्यात आली आहे. माॅर्निग वाॅकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला दोघांनी जबरदस्तीने गाडीत घातलं. हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.(Congress district president Sachin Gujar kidnapped and beaten in Ahilyanagar) 

Continues below advertisement

Continues below advertisement

आज (बुधवारी, ता 26) सकाळी सात वाजता अपहरणाची घटना घडली आहे. सचिन गुजर यांचे अपहरण करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे.अपहरणाची घटना सीसीटीव्ही कँमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आमदार हेमंत ओगले ,सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेनंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून परिसरातील अतिरिक्त सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची हालचाल आणि संशयितांच्या संपर्कांची तपासणी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, आरोपींचा शोध घेतला जात असून, लवकरच सर्व गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.