मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकार प्रयत्नशीलच आहे. पण काही जण ऐकायला तयार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) निशाणा साधला. तसेच पुन्हा एकदा अजित पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पटलावर आहे. त्यातच मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करतील.
दरम्यान यावेळी अजित पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, राज्यात आरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तो प्रश्न सुटावा मग तो मराठा आरक्षणाचा असो की इतर समाजाचा असो. तसेच इतर समाजाने मनात भीती बाळगू नये, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. तसेच यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलं.
सर्वांनी समजूतदारपणा दाखवायला हवा - अजित पवार
मराठा आरक्षण ओबीसीमधूनच हवं अशी मागणी मनोज जरांगेंकडून केली जातेय. तर ओबीसीमधून मराठा आरक्षण घेऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीये. या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी म्हटलं की, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. सर्वांनी समजूतदारपणा दाखवायला हवा.
मुंबईत आंदोलनाचा हाक
आरक्षणाच्या आंदोलनासाठी आता मुंबईत संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी मोठा समुदाय घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. तसेच या आंदोलनासाठी त्यांच्याकडून आझाद मैदानाची मागणी करण्यात येतेय. त्यातच ज्या दिवशी मुंबईत मराठा आरक्षणाची सुरुवात होईल, त्याच दिवशी ओबीसी नेते देखील मराठा आंदोलनासाठी मैदानात उतरणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीये. त्यामुळे आता आरक्षणाची ठिणगी ही मुंबईत पेटणार असल्याचं म्हटलं जातंय.
असा असेल मनोज जरांगेंच्या पायी दिडींचा टप्पा
अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. तसेच हा पायी दिंडीची प्रवास मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मुंबईत पोहचणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. अंतरवाली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे अद्याप ठरवले नव्हते. 20 जाने सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये असणार आहे. प्रत्येक मुक्काम डोंगरात असणार आहे. गावात कोणताही मुक्काम असणर नाही. पहिला मुक्काम शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात असणार आहे.