अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2018 नंतर पुन्हा एकदा शिर्डीच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना ज्या लोकसभा मतदारसंघात हा पूर्ण दौरा असणार आहे. त्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाच दौरा नियोजनाची माहिती दिली जात नसल्याचं समोर आल आहे. 


आज शिर्डी (Shirdi) शासकीय विश्रागृहावर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना विखे यांचे नाव घेता नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी (PM Narednar Modi) यांना शिर्डीत एम्स हॉस्पिटल, आयटी पार्क सुरू करण्याच्या मागणीसह जिल्हा विभाजन मागणीचे निवेदन देणार असल्याची माहिती खासदार लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 2014 ला खासदार झाल्यानंतर निळवंडे कालवे पूर्ण होण्यासाठी शिर्डी ते मुंबई जलदिंडी काढत अनेक वेळा आंदोलन देखील लोखंडे यांनी केली आहे. आज पाणी शेवटपर्यंत पोहचत असल्याचा आनंद असून 52 वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचं सुद्धा लोखंडे यांनी बोलून दाखवलं.


या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, अहमदनगरला (Ahmednagar) पंतप्रधान मोदी नियोजन बैठक असल्याचं बाहेरून कळलं, तेव्हा तिथे गेलो. मात्र तिथे गेल्यावर तलाठी निरोप घेऊन गेला होता, अस मला सांगण्यात आल. बैठक सकाळी ११ वाजता आणि निरोप ८ वाजता दिला जातो. मी खासदार आहे. राखीव असलो तरी स्वाभिमानी आहे. मी लोकांमध्ये राहणारा असून लोकांनी मला निवडून दिल आहे. नरेंद्र मोदी येत आहेत, 2014 पासून या कामाला गती दिली असून त्या कामाचे लोकार्पण होतय, याचा आनंद आहे. मात्राव या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत काहीही माहिती नाही. पण कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की कार्यक्रमाला जायचं आहे. मोदींना धन्यवाद द्यायचे आहे..मी अनेक वर्ष आमदार होतो, आता खासदार आहे. मी पण खमक्या आहे. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलू आज काम पूर्ण होऊन पाणी शेवटपर्यंत पोहचत आहे, याचा आनंद असल्याचे लोखंडे म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी : 


PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 26 ऑक्टोबरला शिर्डी दौरा,विविध कामांच होणार लोकार्पण