अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने (Protest) सुरू आहे. दरम्यान, जालना येथील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांनी देखील आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. कोपर्डीतील निर्भयाच्या समाधीजवळ कुटुंबियांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची झळ संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पोहचली आहे. जालना (Jalna) येथील घटनेननंतर आंदोलन आंदोलन, रास्ता रोको करण्यात आले. अजूनही अनेक भागांत मराठा आंदोलकांकडून आंदोलने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेतील निर्भयाच्या (Nirbhaya) कुटुंबीयांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला असून निर्भयाच्या समाधीजवळ कुटुंबियांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. चार दिवसांत मराठवाड्यासह मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास कोपर्डी येथे निर्भयाच्या समाधी समोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील निर्भयाच्या कुटुंबियांनी दिला आहे. 


मराठा आरक्षण मिळावं, यासाठी जालना येथील अंतरावली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाचा नववा दिवस असून काही दिवसांपूर्वी याच आंदोलन पोलिसांचा लाठीचार्ज झाला. त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहचलं. त्या घटनेनंतर सलग तीन दिवस महाराष्ट्रात आंदोलनं, रास्ता रोको सुरु होते.


दरम्यान, अजूनही महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते उपोषण स्थळी जात असून आंदोलकांची मनधरणी करत आहेत. आंदोलकांची बाजू समजून घेत आहेत. एकूणच आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही मुख्यमंत्री यांनीही पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. त्यानंतर सरकारकडून दोन वेळा शिष्टमंडळ जाऊन आले, मात्र आंदोलक आपल्या उपोषणावर ठाम असून आणखी चार दिवसांची मुदत सरकारला देण्यात आली आहे. 


सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम 


महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केले होते. आजही ही घटना ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढण्यात आले होते. याच निर्भयाच्या कुटुंबियांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. आरक्षण मिळावं यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील मागील 9 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे. जोपर्यंत मराठवाड्यातील मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत उपोषण माघार घेणार नाही, अशी भूमिका व्यक्त केली आहे.