Ahilyanagar : नगर-पुणे रोडवर एसटी बसला भीषण आग (ST Bus Fire) लागल्याची घटना घडली आहे. ही बस पुण्याकडे  (Pune) जात होती. यावेळी एसटी बसला भीषण आग लागून बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग कशामुळं लागली याचे कारण मात्र अस्पष्ट असल्याची माहिती मिळत आहे. 

चालकानं प्रसंगावधान राखल्यामुळं अनर्थ टळला

चालकानं प्रसंगावधान राखत एसटी रोडच्या कडेला घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एसटी बस जळत असल्यामुळे नगर- पुणे महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. सध्या या रस्त्यावर धीम्या गतीनं वाहतूक सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एस टी बसला आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजुला उन्हाचा पारा चांगलाच वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी रस्त्यांचे देखील प्रश्न आहेत. त्यामुळं काही ठिकाणी एसटीचे अपघात देखील होतात. 

पालघरमध्ये दोन दुचाकींचा अपघात, दोघांचा मृत्यू

पालघरमध्ये भरधाव वेगातील दोन दुचाकी एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात दुचाकीस्वार सुरज शिनवार पालवा आणि अक्षय विलास आडगा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. रुपेश गडग गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत सुरज पालवा ऐरंबी गावठणपाडा येथुन रविवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्राची दुचाकी (MH48CP8155) घेवुन दुर्वेस-सावरे रस्त्याने दुर्वेसकडे जात होता. तर मृत अक्षय विलास आडगा व त्याचा मित्र रुपेश परशुराम गडग दुर्वेस येथुन एंबुर खडकीपड्याकडे येत होते. ऐरंबी गावच्या बस स्टॉपजवळ सुरज पालवा याने भरधाव वेगातील दुचाकी राँग साईडने जाऊन अक्षय विलास आडगा व रुपेश परशुराम गडग यांच्या दुचाकीला गाडीला समोरुन धडक दिली. अपघातात सुरज पालवा (वय.27)रा. ऐरंबी गावठाणपाडा आणि अक्षय आडगा (वय. 22) यांचा मृत्यू झाला. अपघातात रुपेश गडग गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
 

महत्वाच्या बातम्या:

Pune Hinjwadi Bus Fire: हिंजवडीतील बसला आग लावलेल्या चालकानं पगार थकवल्याचं सांगितलं कारण; कंपनी मालकाने केला मोठा खुलासा, म्हणाले, 'सर्व पैसे...'