कृषी विभागाच्या चुकीचा शेतकऱ्यांना फटका?
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2017 10:43 AM (IST)
मुंबई : राज्यात तूर खरेदीचं नियोजन फसल्याने सरकार अडचणीत आले आहे. शेतकरी हवालदिल झालाय. मात्र या सर्व प्रकाराला कृषी विभाग कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. तुरीचे दुसऱ्या नजर अंदाजानुसार सरासरी 661.42 हेक्टरी किलोग्रॅम उत्पादन वर्तवण्यात आलं होतं. तिसऱ्या नजर अंदाजानुसार हेच उत्पादन 1133.42 हेक्टरी किलोग्रॅम इतके पुढं आलं आहे. नजर अंदाज प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करावा लागतो. नजर अंदाज साफ चुकल्याची जबाबदारी कृषी विभाग घेईल का, असा सवाल आता विचारला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत. त्यावेळी सरकारी यंत्रणेने सरकारच्याच हातावर दिलेल्या तुरी चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी अधिकारी अडचणीत येऊ शकतात. संबंधित बातम्या :