Adani Group Stock Crash : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर दरात सुरू असलेल्या घसरणीचे सत्र आजही कायम राहिले. जवळपास महिनाभरापासून अदानी समूहाच्या शेअर दरात (Adani Group Market Cap) घसरण सुरू आहे. मागील एक महिन्यात झालेल्या शेअर दरातील घसरणीमुळे अदानी आणि गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. अदानी समूहातील एकूण कंपन्यांचे मार्केट कॅप 9800 कोटी डॉलरची घसरले आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. काही कंपन्यांच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, अदानी यांची संपत्ती 4300 कोटी डॉलरपेक्षा कमी झाले आहे. गौतम अदानी आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 29 व्या क्रमांकावर आहेत. 


एकत्रित मार्केट कॅप 9800 कोटी डॉलरपेक्षा कमी 


'फायनान्शिअल एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप 13500 कोटींहून अधिक घट झाली आहे. आता, मार्केट कॅप 9800 कोटी डॉलरपेक्षा कमी झाले आहे.  24 जानेवारी रोजी एकत्रित मार्केट कॅप 23200 कोटी डॉलर इतके होते. आता, मार्केट कॅप 9700 कोटी डॉलरच्या आसपास आहे. 


गौतम अदानींच्या संपत्तीत घट


या वर्षी गौतम अदानी यांच्या संपत्तीत आतापर्यंत जवळपास 7790 कोटी डॉलर्सची घट झाली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानींची 29 व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. सध्या त्यांची संपत्ती 4270 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 15000 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त होती. 


अदानी समूहातील शेअर्स दरात 83 टक्क्यांची घट


गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीच्या सपाट्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण  झाली आहे. 


अदानी ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीचा शेअर आपल्या उच्चांकी शेअर दराच्या तुलनेत जवळपास 80 टक्क्यांनी घसरला आहे. अदानी टोटल गॅसचा शेअर दरही 80 टक्क्यांनी घसरला आहे. 


अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर दर 83 टक्क्यांनी, अदानी पॉवरचा शेअर 63 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स अॅण्ड एसईझेडचा शेअर 44 टक्क्यांनी आपल्या उच्चांकापासून घसरला आहे. 


अदानी विल्मरच्या शेअर दरातही घसरण सुरू असून उच्चांकापासून 57 टक्क्यांनी घसरला आहे. एनडीटीव्हीच्या शेअर दरात 66 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंटच्या शेअर दरात उच्चांकी दरापासून 38 ते 42 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: