नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी 17 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लक्ष रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर,धरमपेठ, हनुमाननगर, गांधीबाग, सतरंजीपूरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 17 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 161 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.


उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत काँग्रेसनगर, अजनी येथील तिरुपती गारमेन्ट यांच्याविरूध्द कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत हिन्दुस्तान कॉलोनी, अंबाझरी रोड येथील सुनील प्रोव्हिजन यांच्याविरूध्द कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोन अंतर्गत अभय नगर, ओमकार नगर येथील नविन सुपर बाजार यांच्याविरूध्द 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत महाल येथील मेघा मॅचींग सेंटर यांच्याविरूध्द कारवाई करून 10 हजार रुपये दंड वसूल केला. तसेच इतवारी भाजीमंडी येथील महेश अगरबत्ती भंडार, शिवाजी पुतळा, महाल येथील आशीष एन.एक्स आणि आशु एन.एक्स, गांधीगेट महाल येथील Batra Shoes Palace या दुकानांविरुध्द कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत बिनाकी मंगलवारी येथील क्रीष्णा फुड यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच राऊत चौक येथील Brand Boys यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत राणी लक्ष्मी शाळेजवळील बब्लु बॅग हाऊस, वर्धमान नगर येथील जय बेकरी यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशीनगर झोन अंतर्गत कमाल बाजार चौक येथील गुरु नानक किराणा स्टोअर्स आणि के.एन.टी.चिकन शॉप या दुकानांविरुध्द कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत पेंशननगर येथील वैभव साडी सेंटर, जरीपटका येथील अमन फॅशन आणि जय हिंद नगर येथील उमा सुपर मार्केट यांच्याविरूध्द कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.  


या प्लास्टिक वस्तुंवर बंदी


केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधीत करण्यात आले आहे. कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणाऱ्या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिकसह पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी असेल. यासोबतच प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे : काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे इ. आणि 100 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर हे सर्व प्रतिबंधित करण्यात आले आहे.