नागपूर : 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा बुलडाण्यात होणार आहे. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रमात साहित्य संमेलन भरवलं जाणार आहे.
हिवरा आश्रमासारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच साहित्य संमेलन भरवलं जाणार असल्याने या संमेलनाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
बुलडाण्यासोबतच दिल्ली आणि बडोदा ही ठिकाणंही आगामी साहित्य संमेलनासाठी चर्चेत होती. अखेर बुलडाण्यातील हिवरा आश्रमात साहित्य संमेलन होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
90 वं साहित्य संमेलन डोंबिवलीत पार पडलं. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे होते.
आता बुलडाण्यातील ग्रामीण भागात किती साहित्य रसिक पोहोचतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण ठरलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2017 04:01 PM (IST)
बुलडाण्यासोबतच दिल्ली आणि बडोदा ही ठिकाणंही आगामी साहित्य संमेलनासाठी चर्चेत होती. अखेर बुलडाण्यातील हिवरा आश्रमात साहित्य संमेलन होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -