नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी जीएसटी कौन्सिलने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रासायनिक खतांवर आकारण्यात आलेला 12 टक्के कर रद्द करुन तो आता 5 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी रासायनिक खतांना 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आलं होतं.

अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या 18 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटीमध्ये रासायनिक खतांना 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आल्यामुळे देशभरातून विविध प्रतिनिधींनी हा कर कमी करावा, अशी मागणी केली होती.

रासायनिक खतांवरील कर कमी करण्यात आल्याने त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे. 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये रासायनिक खतं ठेवल्यामुळे खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता होती.

जीएसटीनंतर काय महाग, काय स्वस्त

संबंधित बातम्या :

जीएसटी लागू होण्यापूर्वी आज मध्यरात्री हॉटेल बंद राहणार!


महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार


जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!


जीएसटी कराविरोधात चित्रपट महामंडळ संपाच्या तयारीत


सोनं आणि हिऱ्यावर 3 टक्के जीएसटी, 1 जुलैपासून जीएसटी लागू


जीएसटी मंजुरीमुळे ‘मातोश्री’ला काय मिळणार? : वळसे-पाटील


जमीन आणि घरभाड्यावर जीएसटी लागणार!


कीर्तनकार, भागवत कथाकारांनाही जीएसटी, कररचनेत बदल


जीएसटी आल्यानं नेमका फायदा काय?