मुंबई : यंदा पाऊसमान चांगला असेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने अंदाज वर्तवला आहे. दुष्काळ, गारपीट आणि अवकाळीमुळे बळीराजाचं कंबरडं मोडलं असताना स्कायमेटचा अंदाज नक्कीच आशादायी आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून महिन्यात सरासरीच्या 90 टक्के, जुलै महिन्यात 105 टक्के, ऑगस्ट महिन्यात 108 टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 115 टक्के पाऊस पडणार आहे. एकूण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.
जूनमध्ये 164 मीमी पाऊस, जुलैमध्ये 289 मीमी, ऑगस्टमध्ये 261 मीमी, तर सप्टेंबर महिन्यात 173 मीमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. बळीराजाच्या दृष्टीने चांगल्या पावसाचं भाकित स्कायमेटने वर्तवलं आहे.