नागपूरः शहरातील अर्धवट रस्ते आणि बेशिस्त वाहतुकीमुळे शहरात रस्ते अपघातांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या पाच महिन्यात तब्बल 131 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या आठवड्यात एकाच दिवसात 4 जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला.
नागपूर शहरातील रस्ते बरेच रुंद झाले. त्यातत्या त्यात सर्वच सिमेंट रस्त्यांचे जाळे असल्याने वाहतूक सुटसुटीत होणे अपेक्षित होते. मात्र, त्यामुळे अपघातामध्ये घट होणे अपेक्षित होते. मात्र, त्यामुळे अपघातामध्ये घट होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या पाच महिन्यात सातत्याने अपघातामध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 2021च्या पहिल्या पाच महिन्यांच्या तुलनेत यावर्षी पाच महिन्यांतील मृत्यूंची संख्या अधिक आहे. यात 131 जणांना मृत्यू झाला तर 182 जण गंभीर जखमी झाले. यावर्षी हीच संख्या 443 इतकी असून त्यामध्ये 182 गंभीर तर 123 किरकोळ जखमी आहेत. नंदनवन येथे झालेल्या घटनेत भरधाव ऑटोने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिलेचा दुदैंवी मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी खरबी मार्गावर घडली. कविता दिवाकर राऊत (वय 32) रा. मिलननगर असे मृताचे नाव आहे. त्या गुरुवारी दुपारी कल्याणी आढणेकर (वय 22) या मैत्रिणीसोबत मोपेडसोबत मोपेडवर कामानिमित्त बाहेर जात होत्या. गोसावी दुध डेअरी ते साई किराणा दरम्यान अनोळखी ऑटोने मोपेडला मागून धडक दिली. त्यात कविता आणि कल्याणी रस्त्यावर फेकल्या गेल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कविता यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत सीताबर्डी व गिट्टीखदान हद्दीत झालेल्या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये सीताबर्डी हद्दीत मिठानिम दर्गाजवळ भरधाव ऑटोने धडक दिल्याने इमरती उके (वय 55 रा. कडबी चौक, जरीपटका) या पादचारी महिलेचा मृत्यू झाला. अपघाताची दुसरी घटना बुधवारी पहाटे गिट्टीखदान हद्दीत काटोल नाका मार्गावर गोरोवाडा जंगल सफारी गेटसमोर घडली. भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला.
'आपली बस' बेभान
शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर गर्दी असते. अशा गर्दीतही मनपाच्या आपली बसचे चालक बेभान होऊन आणि बेदरकारपणे वाहन पळवीत असतात. या चालकांना गर्दीत बस कशी चालवायची याचे प्रशिक्षण दिले नाही काय? नागरिकांचे जीव या चालकांना स्वस्त वाटतात काय? गुरुवारी रात्री अभ्यंकरनगर ते एलएडी चौकादरम्यान स्टारबस चालकाने परिसरातील भुट्टा विक्रेता नीलेश पटेल (वय 22) यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वाढत्या वाहतूक व्यवस्थेत अपघाताला आवर घालण्याची कसरत आता पोलिस विभागाला करावी लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या