Ramdas Athawale : नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होत आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याला विरोध दर्शवला. ते म्हणाले की,  मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही, त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही, तसा विचार जर होत असेल नक्कीच याचा विरोध करणार आहे.  तसेच पुढे बोलताना मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इतकेच नाही दोन तृतियांश  पेक्षा जास्त आमदार ज्यांच्या बाजूने आहेत. तिच खरी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांनी 200 जण आम्ही निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे  त्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे, आरपीआय ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्तेवर येण्याची संधी मिळते, माझा पक्ष एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे, असेही आठले म्हणाले. कल्याणातील कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमासाठी आठवले अत्रे रंगमंदिरात आले होते. त्यावेळी त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. 


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी - रामदास आठवले
 शिवसेनेतून उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला कंटाळून ,किंवा संजय राऊत यांच्या अनेक वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यासाठी सगळे आमदार एकत्र झाले आहेत. शिवसेनेचा अधिकृत गट बनवला आहे, त्यांच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत, तीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोक राहणार आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं. एकनाथ शिंदे यांनी 200 जण आम्ही निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे, असे रामदास आठवले म्हणाले.  


 मंत्री मंडळाच्या विस्तारात आरपीआयला एखादे मंत्रीपद नक्की मिळेल - रामदास आठवले
आरपीआयला नक्कीच एखादं मंत्री पद मिळेल सत्तेत सहभाग मिळेल. अधिवेशनापुरत जे मंत्री मंडळ आहे ते शॉर्ट मध्ये बनवण्यात येणार आहे, जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा आरपीआयला नक्कीच एखादं मंत्री पद मिळेल. सत्तेत सहभाग मिळेल. तसेच  महामंडळ उपाध्यक्ष सभासद नक्की मिळेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.  


एकनाथ शिंदे यांचा फोन वर बोलताना व्हिडिओ काही गैर नाही - रामदास आठवले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांशी फोन वर बोलताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत आठवले यांनी  कुठल्या कामासाठी जर मुख्यमंत्री बोलले असतील तर तो जो व्हिडिओ अजिबात गैर नाही, काम करा अस एखाद्या अधिकाऱ्याला सांगणं हे मुख्यमत्र्यांच कर्तव्य आहे. जरी कुणी याबाबत टीका केली असेल तर त्या टीकेला अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांना मोबाईलवर बोलण्याचा अधिकार आहे, पूर्वीचे मंत्री मोबाईलवर अनेकांना आदेश देत होते, त्यामुळे यात काही गैर नाही असेही आठवले यांनी स्पष्ट केलं