लग्नाला या! राज ठाकरेंकडून अमित यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगीचरणी
राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन - डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या.
रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगी देवीचरणी ठेवली.
पुढच्या वर्षी 27 जानेवारीला अमित ठाकरे विवाहबंधनात अडकणार आहेत.
अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 11 डिसेंबर 2017 रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -