LIVE : घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या 12 वर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सुनील शितप पोलिसांच्या ताब्यात, विक्रोळी पार्कसाईट पोलिसांची कारवाई
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सुनील शितप यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या 12 वर, एनडीआरएफची माहिती, शोधमोहीम आणि मदतकार्य अद्याप सुरुच
घाटकोपर दुर्घटनेतील पीडितांसाठी महापालिकेच्या शाळेत तात्पुरता निवारा, रात्रभर शोधमोहीम आणि मदतकार्य सुरुच राहणार
घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 16 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश, पीडितांच्या नातेवाईकांचा आक्रोश
घाटकोपर दुर्घटना प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
घाटकोपर दुर्घटना प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घाटकोपरमधील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी धोकादायक इमारतीला कुठलीही नोटीस दिली नसल्याचं महापौर महाडेश्वर म्हणाले. शिवाय दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
घाटकोपर दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, 10 ते 12 जणांना बाहेर काढलं, 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहतादेखील दुर्घटनास्थळी पोहोचले
घाटकोपरमधील साईदर्शन इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता, महापालिका प्रशासनाचा दावा, तर आम्हाला अशी कोणतीही माहिती किंवा नोटीस दिली नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं
घाटकोपर इमारत दुर्घटना : चौकशी करुन दोषींवर कारवाई करु : प्रकाश मेहता
दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत : प्रकाश मेहता
साईदर्शन इमारतीमध्ये असलेल्या नर्सिंग होमने नुतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती : प्रकाश मेहता
ही इमारत बेकायदेशीर नव्हती : प्रकाश मेहता
घाटकोपरमधील साईदर्शन इमारतीच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची माहिती
घाटकोपरमधील साईदर्शन इमारतीच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची माहिती
मुंबई : या इमारतीत एकूण १२ कुटुंब होती. इमारतीचा स्लॅब कोसळल्याने कुटुंब अडकली आहेत. सध्या सर्च कॅमेऱ्याने अडकलेल्यांचा शोध सुरु
ही इमारत 30 वर्षे जुनी होती. रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता.
या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.
घाटकोपरमधील दुर्घटनेचं ठिकाण
शिवसेनेच्या विभागप्रमुखांची माहिती :
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकले आहे. ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलेल्या नागरिकांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या इमारतीला तडे गेले होते. इमारतीखाली असलेल्या नर्सिंग होमचं रिनोव्हेशन सुरु होतं. त्यामुळे हॉस्पिटल रिकामं होतं. परंतु वरच्य मजल्यांवर लोक राहत होते. ही इमारत जुनी होती, मात्र महापालिकेच्या नोटीसविषयी अद्याप माहिती नाही, असं शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितलं.

30 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता, 9 जणांना सुखरुप बाहेर काढलं

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.