Mumbai Rains : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक तासाभराच्या खोळंब्यानंतर पुन्हा सुरु

मुंबई आणि परिसरत धो-धो पाऊस सुरु झाला आहे. पावसामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कलमध्ये यांसारख्या सखल भागात पाणी साचलं आहे. तर लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jul 2019 10:20 PM
UPDATE | मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरु, पनवेलकडे जाणारी खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत
UPDATE | मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरु, पनवेलकडे जाणारी खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, बेलापूर लोकल वडाळा स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे अडकली, पनवेलकडे जाणारी वाहतूक खोळंबली, कुर्ला स्थानकात 40 मिनिटांपासून लोकल नाही
मध्य रेल्वेच्या गाड्या अजूनही उशिरानेच, धीम्या मार्गावर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने, मध्य रेल्वेवर सकाळपासून 72 गाड्या रद्द, तर हार्बर मार्गावर 31 गाड्या रद्द, अनेक लोकल वेगवेगळ्या स्टेशनवर स्थगित, रात्रीपर्यंत आकडा वाढण्याची शक्यता
मुंबई : पश्चिम रेल्वेवर दिवसभरात 100 लोकल फेऱ्या, तर 16 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द, मरिन लाईन्सजवळ झालेला अपघात आणि पावसामुळे निर्णय, पालघरमध्ये झालेल्या पावसामुळे ट्रॅकवर पाणी, डहाणू-पनवेल आणि वसई-दिवा मेमू सर्व्हिसही रद्द
गेल्या 9 तासात डहाणूमध्ये 126 मिमी, महाबळेश्वरमध्ये 73 मिमी, सांताक्रुझ, मुंबई परिसरात 82 मिमी पावसाची नोंद

गेल्या 9 तासात डहाणूमध्ये 126 मिमी, महाबळेश्वरमध्ये 73 मिमी, सांताक्रुझ, मुंबई परिसरात 82 मिमी पावसाची नोंद

पुढच्या 24 तासांमध्ये मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याची माहिती, गेल्या 4 दिवसांत कुलाब्यात 433 तर सांताक्रूझमध्ये 607 मिलीमिटर पाऊस
नवी मुंबई : कोकण भवन सरकारी कार्यालयात पाणी साचलं, तळमजल्यावर एक फुटाच्या वर पाणी साचल्याने फाईल्स भिजल्या

लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण अखेर भरलं, धरणाच्या पायरीवरून वाहणार पाण्याचा प्रवाह सध्यातरी कमी, धरण भरण्यासाठी यंदा जूनपासून 650 मिलिमीटर पावसाची नोंद व्हावी लागली, यंदा पावसाने उशिरा कृपादृष्टी दाखवल्याने धरण भरायला वेळ लागला.

सातारा : महाबळेश्वर - तापोळा रोडवर झाड कोसळले, झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळित, झाड काढण्याचे काम सुरु
सातारा : महाबळेश्वर - तापोळा रोडवर झाड कोसळले, झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळित, झाड काढण्याचे काम सुरु
पालघर : पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच, जिल्ह्यातील सूर्या आणि वैतरणा ह्या दोन्ही मुख्य नद्या ओसंडून वाहत असून, धोक्याची पातळी ओलांडण्याच्या तयारीत, नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून धोक्याचा इशारा
नालासोपारा : नालासोपारऱ्यात तुलिंज येथील वर्तक टॉवरच्या पाठीमागे पीटर पॅलेस जवळ झाड आणि स्ट्रीट लाईटचा खांब पडला, सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली, यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही
नालासोपारा : नालासोपारऱ्यात तुलिंज येथील वर्तक टॉवरच्या पाठीमागे पीटर पॅलेस जवळ झाड आणि स्ट्रीट लाईटचा खांब पडला, सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली, यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही
लोकलच्या खोळंब्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी, हार्बर रेल्वेवर अर्धा तासापासून गाड्या जागच्याजगीचं, वाशी ते पनवेल दरम्यान सीएसएमटी कडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम, कंटाळून प्रवास्यांनी ट्रॅकवर चालणं पसंत केलं

मुंबईतल्या धुंवाधार पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलसाठ्यात वाढ, सध्या तलावांमध्ये 104496 दशलक्ष लिटर पाणी म्हणजेच 7.22 टक्के पाणीसाठा
मुंबई : कर्जत – खोपोली रेल्वे सेवा ठप्प, ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने लोकल आणि एक्सप्रेस सेवा ठप्प

मुंबई : मुसळधार पावासाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसटीकडे जाणारी वाहतूक ४०-४५ मिनिटे उशीराने, सायन-कुर्ला दरम्यान फास्ट ट्रॅकर पाणी वाढलं तर पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवेवर परिणाम
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबोली, गगनबवडा, करुळ या तिनही घाटात दाट धुकं, घाटात दाट धुकं असल्याने वाहनचालकाना गाड्या सावकाश चालवाव्या लागत आहेत, धुक्यामूळे दोन ते तीन फुट अंतरावरचे दिसत नाही आहे
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबोली, गगनबवडा, करुळ या तिनही घाटात दाट धुकं, घाटात दाट धुकं असल्याने वाहनचालकाना गाड्या सावकाश चालवाव्या लागत आहेत, धुक्यामूळे दोन ते तीन फुट अंतरावरचे दिसत नाही आहे

नवी मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे काही भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. खारघरच्या सेक्टर 10 मधील रस्ते जलमय झाले आहेत.

पार्श्वभूमी

मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. मुंबई शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगर, पालघरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला आणि कुर्ला वेस्ट या सखल भागात पुन्हा पाणी साचलं आहे.

खरंतर गुरुवारी आणि शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसाने काल मुंबईत उघडीप घेतली होती. त्यामुळे पावसाच्या त्रासापासून मुंबईकर वाचले होते. मात्र आता पुन्हा पावसाची संततधार सुरु झाल्याने सखल भागात पुन्हा पाणी साचलं आहे.

मुंबईची लाईफलाईन मंदावली

या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या लाईफलाईनवरही झाला आहे. पावसामुळे लोकल सेवा मंदावली आहे. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे, तर हार्बर मार्गावरील गाड्या 10 मिनिटं उशिराने धावत आहेत. तसंच पश्चिम रेल्वेच्या लोकल 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. पावसामुळे सायन- माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे रुळावर पाणी आलं आहे.  याशिवाय पावसामुळे ट्रॅकवर पाणी आल्याने पालघर स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्या रखडल्या आहे.

वलसाड फास्ट पॅसेंजर फ्लाईंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरला मध्यरात्री येणारी अवध एक्स्प्रेस पहाटे पोहोचली आहे.

मुसळधार पावसामुळे पालघर जलमय

मुसळधार पावसामुळे पालघर जलमय झालं आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पालघर ते सफाळे, तलासरी ते उंबरगाव आणि बोईसर ते पालघर हे सर्व रस्ते बंद झाले आहेत. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर पाहायला मिळतं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.