LIVE BLOG | CSMT पूल दुर्घटना | महापालिका आयुक्तांचे दक्षता विभागाला चौकशीचे आदेश

सीएसएमटी पूल दुर्घटनेविषयी 24 तासात अहवाल देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दक्षता विभागाला दिले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Mar 2019 08:40 PM


आयुक्त घटनास्थळी फिरकलेच नाहीत या वाक्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून स्पष्टीकरण ,

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (रेल्वे स्टेशन) आणि टाईम्स ऑफ इंडिया इमारतीजवळील पादचारी पूलाचा काही भाग कोसळून झालेल्या दि. १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी दुर्दैवी अपघात झाला..

त्यानंतर महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी घटनास्थळी धाव घेतली व सुरु असलेल्या बचाव कार्याची पाहणी करीत आवश्यक ते प्रशासकीय संनियंत्रण केले.
सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई,
मुख्य अभियंता ए.आर पाटील, एस. एफ काकुळते यांचे निलंबन
सहा मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या पुलाचं पाडकाम सुरु, जेसीबीच्या सहाय्यानं तोडकाम, लोखंडी सांगाडाही हटवणार
मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा पूल पूर्णपणे पालिकेचा असल्याचा निष्कर्ष, एफआयआरमध्ये असलेलं मध्य रेल्वेचं नाव काढलं जाण्याची शक्यता
24 तासात अहवाल द्या, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांचे दक्षता विभागाला आदेश, ऑडिट, सुचवलेली दुरुस्ती याबाबत माहिती देण्यास बजावलं
मुंबई पूल दुर्घटनेनंतर जेजे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक पीडिमेलो रोड आणि मेट्रो सिनेमापासून वळवण्यात आली आहे.




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीटी रुग्णालयात जाऊन पादचारी पूल दुर्घटनेतील जखमींची भेट घेणार
सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर आज सकाळी 10 वाजता मुंबई महापालिका आयुक्तांनी रस्ते-पूल विभागाची बैठक बोलावली
मुंबई सीएसएमटी पूल दुर्घटना : मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या संबंंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, निष्काळजीमुळे मृत्यूस पात्र ठरणे यासाठी कलम 304 अ अन्वये आझाद मैदान पोलिसात गुन्हा

पार्श्वभूमी

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा सहावर पोहचला आहे. टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेल्या पादचारी पुलाचा कामा रुग्णालयाजवळचा भाग काल (14 मार्च) संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कोसळला होता. पूलाचा भाग कोसळल्याने तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), जाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35) मोहन कायगुंडे अशा सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. शिवाय, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे. तसंच दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणाऱ्या या पुलाचा स्लॅब कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. घटनास्थळावरुन गर्दी हटवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पुलाचा सांगाडा कोसळण्याची भीती असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी गर्दी कमी करण्याचं काम करत होते.

अग्निशमन दल, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी बचावकार्य राबवलं. पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची टीम मुंबईकडे रवाना झाली. या पुलावर असलेली क्राँक्रिट स्लॅब पूर्णपणे पाडण्यात आली. आता केवळ पुलाचा सांगाडा उरला आहे.



दोन वर्षांआधीच स्थानिक नगरसेवकांनी या ब्रिजच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे यावेळी स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.

मुंबईतल्या पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेतली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी असल्याच्या भावना मोदींनी ट्विटरवर व्यक्त केल्या.






ब्लेम गेम

मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने पुलाची जबाबदारी घेण्याऐवजी सुरुवातीला हात वर केले होते. रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील पूल हा रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत तर टर्मिनसला जोडणारा पूल महापालिकेच्या अंतर्गत येतो, असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं होतं. तर हा संपूर्ण पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याचं महापालिकेचं म्हणणं होतं. काही काळ चाललेल्या टोलवाटोलवीनंतर पूल बीएमसीचाच असल्याची कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गुन्हा दाखल

मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या संबंंधित अधिकाऱ्यांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम 304 अ अन्वये आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल झाला.

घटनेतील मृतांची नावं

1.    अपूर्वा प्रभू 35 वर्ष
2.    रंजना तांबे 40 वर्ष
3.    जाहीद शिराज खान 32 वर्ष
4.    भक्ती शिंदे 40 वर्ष
5.    तपेंद्र सिंह 35 वर्ष

घटनेतील जखमींची नावं

1.    सोनाली नवले 30 वर्ष
2.    अध्वित नवले 3 वर्ष
3.    राजेंद्र नवले 33 वर्ष
4.    राजेश लोखंडे 39 वर्ष
5.    तुकाराम येडगे 31 वर्ष
6.    जयेश अवलानी 46 वर्ष
7.    महेश शेरे
8.    दीपक पारेख
9.    अजय पंडित 31 वर्ष
10.    हर्षदा वाघाळे 35 वर्ष
11.    विजय भागवत 42 वर्ष
12.    निलेश पाटावकर
13.    परशुराम पवार
14.    मुंबलिक जैसवाल
15.    मोहन मोझाडा 43 वर्ष
16.    आयुषी रांका 30 वर्ष
17.    सिराज खान
18.    राम कुपरेजा 59 वर्ष
19.    राजेदास दास 23 वर्ष
20.    सुनील गिर्लोटकर 39 वर्ष
21.    अनिकेत अनिल जाधव 19 वर्ष
22.    अभिजीत माना 31 वर्ष
23.    राजकुमार चावला 49 वर्ष
24.    सुभाष बॅनर्जी 37 वर्ष
25.    रवी लगेशेट्टी 40 वर्ष
26.    नंदा विठ्ठल कदम 56 वर्ष
27.    राकेश मिश्रा 40 वर्ष
28.    अत्तार खान 45 वर्ष
29.    सुजय माझी 28 वर्ष
30.    कानुभाई सोलंकी 47 वर्ष
31.    अनोळखी


या पुलाचा जवळपास 60 टक्के स्लॅब रहदारीच्या रस्त्यावर कोसळल्याने एकच हाहाकार उडाला.












सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे



 

संबंधित बातम्या


पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी

 


मुंबई पूल दुर्घटना : मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री 

 


सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे 

 


बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका

 


पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप

 


'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे

 


रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली 


VIDEO

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.