LIVE : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
16 तासानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे
बेस्ट कामगार कृती समितीचे सदस्य ‘मातोश्री’वर दाखल, शशांक राव, सुहास सामंत उपस्थित, उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार
मुंबई : बेस्ट संपाबाबत 3 वाजता ‘मातोश्री’वर बैठक, संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार
मुंबईकरांची पायपीट थांबवण्याची सगळी सूत्र आता ‘मातोश्री’च्या अंगणात पोहोचली आहेत. कारण यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेचे महापौर आणि बेस्ट कृती समिती यांची ‘मातोश्री’वरच बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजता होणाऱ्या बैठकीनंतर या संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र, तोवर मुंबईकरांची पायपीट ही सुरुच राहणार आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - पगार वेळेवर मिळावा, तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - पगार वेळेवर मिळावा, तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी
मुंबई : मुंबईतील ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पगार वेळेवर मिळावा आणि तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबतच्या बैठकीनंतरही बेस्ट कर्मचारी संपावर अटळ आहेत. आज मध्यरात्रीपासून 36 हजार बेस्ट कर्मचारी संपावर जातील, अशी माहिती शशांक राव यांनी दिली.

महापौर बंगल्यावर महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि बेस्ट समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न टप्प्याटप्प्यानं सोडवू, असं आश्वासन महापौरांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं. मात्र जोपर्यंत आयुक्तांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याचं शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.