LIVE | शिवसेना-भाजप लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी युती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवसेना-भाजप युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज सायंकाळी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अधिकृत घोषणा करतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2019 09:46 PM
देशातल्या सरड्यांची मान शरमेनं खाली गेली असेल, की आपल्यापेक्षाही जास्त रंग बदलणारे लोक या ठिकाणी आहेत, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचं टीकास्त्र
मुंबई : युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनाचा बेत, फडणवीसांसोबत अमित शाह, पियुष गोयल, रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार 'वर्षा'वर
मुंबई : युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनाचा बेत, फडणवीसांसोबत अमित शाह, पियुष गोयल, रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार 'वर्षा'वर
शिवसेना-भाजप युती महाराष्ट्र लोकसभेच्या किमान 45 जागा जिंकेल : अमित शाह
शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्र, युती करावी ही लाखो कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली : अमित शाह
जागावाटप आणि जबाबदारीचं वाटप समसमान करु, सेना-भाजप एकदिलाने एकत्र आले तर हा एक मजबूत देश बनेल : उद्धव ठाकरे
नाणारचा प्रकल्प हलवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार : उद्धव ठाकरे
राम मंदिराची जागा न्यासाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं, या मुद्द्यावर एकत्र आलो : उद्धव ठाकरे
विधानसभेसाठी घटकपक्षांशी चर्चा करुन उरलेल्या जागा शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या लढू : मुख्यमंत्री
नाणार संदर्भात उद्योग विकासाला विरोध नाही, पण नाणार प्रकल्पाची जागा बदलणार : मुख्यमंत्री
लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23, भाजप 25 जागांवर लढणार : मुख्यमंत्री
सत्ता, पदे याला महत्व न देता शेतकरी, गरीबांचे व्यापक प्रश्न घेऊन युतीचा निर्णय : मुख्यमंत्री
शिवसेना-भाजप एकत्र यावेत ही जनभावना होती, या भावनेचा आदर राखत लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय : मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे-अमित शाह यांची संयुक्त पत्रकार परिषद

शिवसेना-भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद, मात्र हिंदुत्वाचा दुवा समान : मुख्यमंत्री
शिवसेना-भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद, मात्र हिंदुत्वाचा दुवा समान : मुख्यमंत्री
शिवसेना-भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद, मात्र हिंदुत्वाचा दुवा समान : मुख्यमंत्री
अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बैठक सुरु, बैठकीनंतर युतीबाबत घोषणा करणार
युतीच्या घोषणेआधीच स्थानिक पातळीवर धुसफूस, पालघर लोकसभेची जागा मित्रपक्षाला जाण्याच्या शक्यतेने भाजपच्या विक्रमगड तालुका अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
भाजपाध्यक्ष अमित शाह 'मातोश्री'वर दाखल, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर युतीबाबत घोषणा करणार
सोफिटेल हॉटेलमधील भाजप नेत्यांची बैठक संपली, भाजपाध्यक्ष अमित शाहांसह नेते 'मातोश्री'च्या दिशेने रवाना, युतीच्या मनोमिलनावेळी खडसेंची अनुपस्थिती
युतीच्या घोषणेसाठी भाजपची जम्बो टीम हजर,अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषदेला
शिवसेना सत्तेसाठी लाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा घणाघात, काही दिवसात महाआघाडीचा निर्णय, पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याची माहिती, युतीच्या निर्णयाने आम्हाला फरक नाही, मनसेबाबत अजूनही सकारात्मक विचार नसल्याचं वक्तव्य
ईडीची भीती घातल्यामुळे शिवसेना युती करणार, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप
ईडीची भीती घातल्यामुळे शिवसेना युती करणार, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप
भाजपची अंतर्गत बैठक सुरु असताना शिवसेनेच्या नेत्यांचीही महत्त्वाची बैठक सुरु, बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित
भाजप अध्यक्ष अमित शाह वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलमध्ये दाखल, भाजप नेत्यांची बैठक घेणार, तर मातोश्रीवर संजय राऊत, मनोहर जोशी, दिवाकर रावते उपस्थित
भाजपाध्यक्ष अमित शाह विमानतळावरुन वांद्र्याच्या दिशेने रवाना, भाजप नेत्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता, बैठकीनंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन युतीबाबत अधिकृत घोषणा करण्याची चिन्हं
भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबई विमानतळावर दाखल, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार स्वागताला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत चर्चेनंतर युतीबाबत अधिकृत घोषणा होणार

पार्श्वभूमी

मुंबई : शिवसेना-भाजप युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज सायंकाळी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अधिकृत घोषणा करतील. त्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह दुपारी साडेचारच्या सुमारास मुंबईत दाखल झाले आहेत. दोन्ही पक्षनेत्यांनी राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठका सुरु केल्या आहेत.

अमित शाह मुंबईत दाखल झाले असून, सोफीटेल हॉटेलमध्ये शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला मातोश्रीवरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. शिवसेनेच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक बडे नेते उपस्थित आहेत.

दरम्यान अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचेही मुंबईतले अनेक नेते सोफीटेल हॉटेलमध्ये भाजपच्या बैठकीला उपस्थित आहेत. ही बैठक संपल्यानंतर अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस हे दोघेच 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यानंतर या नेत्यांमध्ये युतीसंदर्भात बोलणी होतील.
व्हिडीओ



सायंकाळी 6.30 वाजता शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत अमित शाह आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.