Oscars 2019 | अॅण्ड द ऑस्कर गोज टू....ग्रीन बुक

ऑस्कर... चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा सन्मान, प्रत्येक कलाकाराचं स्वप्न... 90 वर्षांची परंपरा आणि जगातील सर्वोत्तम कलाकृतींचा गौरवसोहळा... 91वा ऑस्कर सोहळा डॉल्बी थिएटरमध्ये सुरु आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Feb 2019 04:51 PM






सर्वोत्कृष्ट चित्रपट - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट चित्रपट - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फॉन्सो क्वारॉन - रोमा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फॉन्सो क्वारॉन - रोमा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ऑलिव्हिया कोलमन - द फेव्हरिट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ऑलिव्हिया कोलमन - द फेव्हरिट
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रमी मॅलेक - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रमी मॅलेक - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट गाणं - शॅलो - अ स्टार इज बॉर्न
सर्वोत्कृष्ट (आधारित) पटकथा - ब्लॅकक्लॅन्समन
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट - स्किन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फर्स्ट मॅन
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट - पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - बाव
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर - स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर - स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - महेरशाला अली - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - महेरशाला अली - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट संकलन - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (परदेशी भाषा विभाग) - रोमा
सर्वोत्कृष्ट चित्रपट (परदेशी भाषा विभाग) - रोमा
सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट छायांकन - अल्फॉन्सो क्वारॉन - रोमा
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - हॅना बेकलर - ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - रुथ कार्टर - ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - व्हाईस
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर - फ्री सोलो
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - रेजिना किंग - इफ बील स्ट्रीट कुड टॉक

पार्श्वभूमी

लॉस एंजलिस : अकॅडमी अवॉर्ड शो अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 91 व्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा आज होणार आहे. या सोहळ्याला जगभरातील तमाम कलाकार हजर राहणार आहेत. ऑस्कर पुरस्कार 2019 मध्ये गेम ऑफ थ्रोन्स फेम अॅमिलिया क्लार्क आणि जेसन मोमोआ विजेत्यांना सन्मानित करतील. तर लेडी गागा आणि ब्रॅडली कूपर यांच्या खास परफॉर्मन्स हे सोहळ्याचं विशेष आकर्षण असेल.

पुरस्कार सोहळ्यात होस्ट नाही
91वा ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक कारणांनी स्मरणात राहिल. उदाहरणार्थ या सोहळ्यासाठी कोणताही होस्ट नसेल. याआधी 1989 च्या अकॅडमी अवॉर्ड शोमध्ये असं घडलं होतं. खरंतर यंदा पुरस्कार सोहळ्याच्या होस्टची जबाबदार अभिनेता आणि कॉमेडियन केविन हार्टवर सोपवली होती. पण काही दिवसांपूर्वी त्याचे जुने ट्वीट्स व्हायरल झाले होते. 2009-10 मध्ये ट्विटवर केलेल्या अँटी-गे स्टेटमेंट्समुळे त्याला हा शो सोडण्यास सांगितलं. सोहळा सोडताना हार्टने यासाठी माफीही मागितली होती.

कोणकोणत्या चित्रपटांना सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत नामांकन?

ब्लॅक पँथर

ब्लॅक क्लान्झमन

दी बोहेमियन ऱ्हाप्सडी

द फेव्हरिट

ग्रीन बुक

रोमा

अ स्टार इज बॉर्न

व्हाईस

या चित्रपटांपैकी रोमा आणि द फेव्हरिट यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 10 नामांकनं मिळाली आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ अ स्टार इज बॉर्न चित्रपटाला 8 नामांकनं मिळाली आहेत

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादींमध्ये कोणाला नामांकनं?

सर्वोत्कृष्ट                          दिग्दर्शक

दिग्दर्शक                           चित्रपट

स्पाइक ली                       -   ब्लॅकक्लॅन्समन

पावेल पावलीकोव्स्की         -   क्लोड वॉर

योरगॉस लँथीमोस              -   द फेव्हरिट

अल्फॉन्सो क्वारॉन              -   रोमा

अॅडम मके                   -      व्हाईस

एकाहून एक वर्चढ असलेल्या दिग्दर्शकांच्या नजरेतून साकरलेल्या कृलाकृत्या यंदाच्या ऑस्कर्सच्या नामांकनाच्या मानकरी ठरल्यात

आणखी दोन कॅटॅगरीच्या पुरस्कारासाठी साऱ्या जगाचं लक्ष ऑस्करकडे असते...

त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कॅटॅगरीजचा समावेश आहे..

पाहुयात यंदाची नामांकनं...

सर्वोत्कृष्ट अभिनेता

अभिनेता                     चित्रपट

क्रिश्चन बेल        -         व्हाईस

ब्रॅडली कूपर      -         अ स्टार इज बॉर्न

विलम डफो       -        अॅट इटर्निटीज स्टेट

रमी मलेक         -       बोहेमिन ऱ्हॅप्सोडी

विगो मॉर्टेन्सन     -       ग्रीन बुक

सर्वोत्कृष्ट                            अभिनेत्री

अभिनेत्री                               चित्रपट

यालित्झा अपारशिओ       -        रोमा

ग्लेन क्लोज                    -        द वाईफ

ऑलिव्हिया कोलमन     -        द फेव्हरिट

लेडी गागा                    -        अ स्टार इज बॉर्न

मेलिसा मॅकार्थी             -         कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.