Pippa Review: सध्या चित्रपटगृहात रिलीज व्हावेत असे चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहेत. पिप्पा (Pippa) या चित्रपटाल घाईघाईने अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे कथानक कसे आहे, तसेच या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाबद्दल जाणून घेऊयात...
चित्रपटाचे कथानक
चित्रपटाची कथा ही पिप्पा नावाच्या टँकची आहे, जो पाण्यावर चालणारा भारताचा पहिला टँक होता. या टँकने 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रूची अवस्था बिकट केली होती. टँकच्या नावावरुन चित्रपटाचे नाव देण्यात आले आहे, हे आश्चर्यकारक आहे. ईशान खट्टर, मृणाल ठाकूर आणि प्रियांशू पैन्युली हे चित्रपटात भाऊ-बहीण दाखवण्यात आले आहेत. त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते शहीद झाले आहेत. जेव्हा ईशान खट्टर म्हणजेच ब्रिगेडियर बलराम मेहता यांना पिप्पा टँकची चाचणी करण्यास सांगितले जाते तेव्हा तो आपल्या अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन करतो आणि टँक खोलवर नेतो.बलराम मेहता यांना त्यांचे कुटुंबीय कमी लेखत असतात. बलराम यांचा मोठा भाऊ युद्धाला जातो. तसेच त्यांच्या बहिणीला कोडिंग येत असते त्यामुळे ती देखील सैन्यात भरती होते पण नंतर बलराम यांना आपली क्षमता सिद्ध करायची असते. तीन लोकांच्या बसण्याची क्षमता असलेल्या टँकीचे रूपांतर चार लोकांच्या बसण्याच्या जागेत ते करतात. हे पाहून लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ हे त्यांना युद्धावर पाठवतात. मग एक युद्ध होते आणि काय होते हे आपल्या सर्वांना माहित आहे परंतु ही कथा ज्या प्रकारे दाखवण्यात आली आहे ते विलक्षण आहे.
कसा आहे चित्रपट?
हा एक उत्तम चित्रपट आहे. हा चित्रपट पहिल्या फ्रेमपासून प्रभावित करतो. चित्रपटाचे नाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एखाद्या चित्रपटाचे नाव टँकीवरून कोणी कसे ठेवू शकते? परंतु कदाचित हे चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. चित्रपटात केवळ पिप्पा टँकची ताकद दाखवण्यात आली नाही. तर सैन्यातील शूर जवानांचे शौर्य देखील दाखवण्यात आलं. जेव्हा पिप्पाचा शत्रूवर अटॅक करते तेव्हा खूप अभिनमान वाटतो. ही कथा मोठ्या पडद्यावर मांडायला हवी होते असे वाटते. चित्रपटात जेव्हा सॅम माणेकशॉ येतात तेव्हा विकी कौशलच्या सॅम बहादूर या चित्रपटाचा ट्रेलर आठवतो. कमल सदाना यांनी पिप्पा चित्रपटत सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे.
कलाकारांचा अभिनय
ईशान खट्टरने चित्रपटामधील त्याची भूमिका उत्तमपणे साकारली आहे. चित्रपटामधील ईशानचे वॉर सीन्स पाहून अंगावर शहारे येतात, अशातच चित्रपटामधील इमोशन्स सीन्स पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतं.मृणालने देखील चित्रपटात चांगला अभिनय केला आहे. ईशानच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत प्रियांशू पैन्युलीचे कामही जबरदस्त आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन
राजा कृष्ण मेनन यांनी या चित्रपटाचे चांगले दिग्दर्शन केलं आहे. चित्रपट कुठेही ओढलासारखा वाटत नाही. चित्रपटातील प्रत्येक पात्राला आवश्यक तेवढी जागा देण्यात आली आहे आणि स्टार्सपेक्षा कथेच्या प्रवाहाकडे अधिक लक्ष देणे हे एका चांगल्या दिग्दर्शकाचे वैशिष्ट्य आहे.
चित्रपटाचे संगीत
एआर रहमानने पुन्हा एकदा त्यांची जादू दाखवली आहे. चित्रपटाचे संगीत अप्रतिम आहे.अरिजित सिंहचे 'मैं परवाना' हे गाणं खूप छान आहे. चित्रपटामधील बाकीची गाणीही चांगली आहेत.
एकंदरीत हा चित्रपट बघायलाच हवा. कारण असे चित्रपट दखवून देतात की, चांगला सिनेमा बनवता येतो. तुमच्याकडे फक्त चित्रपट निर्माण करण्याची इच्छा असणे आवश्यक आहे.