'शिवशाही' लग्नाची अनोखी गोष्ट
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2018 08:17 PM (IST)
1
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये पारंपरिक लग्नविधीला फाटा देत शिवशाही पद्धतीने एक अनोखा लग्नसोहळा पार पडला.
2
इस्लामपूर येथील श्रीधर पाटील व मैथिली पाटील या उच्चशिक्षित जोडप्यांनी लग्नामधील अनाठायी खर्चाला फाटा देत लग्नाची गाठ बांधली आहे.
3
वराने संभाजी महाराज आणि वधूने येसूबाई यांची वेशभूषा धारण केली होती.
4
जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळशीच्या साक्षीने एक उच्चशिक्षित जोडप्याने विवाहबद्ध होत समाजाला एक नवी दिशा देण्याच्या प्रयत्न केला.
5
जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि तुळशीच्या झाडाला पाणी घालून साताजन्माची गाठ बांधली.
6
या शिवशाही लग्न सोहळ्यासाठी वधूवरांनी विशेष वेशभूषाही परिधान केली होती.
7
विवाहासाठी भटजी, अक्षता तसेच विधी अशा अनेक अनावश्यक गोष्टी यावेळी टाळण्यात आल्या होत्या.