LIVE BLOG : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा लढवणार, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Sep 2019 11:23 PM
शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी घोषित,
आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार
कॉंग्रेसची पहिली यादी जाहिर, पहिल्या यादीत बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदेंसह 51 उमेदवारांच्या नावाचा समावेश
औरंगाबाद : पैठणचा तहसीलदार शेतकऱ्यांकडून 30 लाखांच्या लाचेची डिमांड करुन 1 लाख रुपये लाच स्वीकारताना अटक, कार्यालयीन कामात शेतकऱ्यांची कामे न करत चक्क सुट्टीच्या दिवशी रविवारी कार्यालय चालू ठेवून स्वीकारली लाच
बीड: कासारी येथील तलावात बुडून माय-लेकाचा मृत्यू ,

धारुर-तालुक्यातील कासारी(बोडखा) येथील घटना
,
शितल बडे, ओमकार बडे असं मृत माय लेकाचे नाव
पुण्याच्या आंबेगावमध्ये तीन मुलं घोडनदीत बुडाली. शोधकार्य सुरू. वैभव चिंतामण वाव्हळ (वय 16), श्रेयस सुधीर वाव्हळ (वय 15) आणि प्रणय राजेंद्र वाव्हळ (वय 15) अशी तिन्ही मित्रांची नावं आहेत.
सेना - भाजप युतीचं घोडं अजूनही काही जागांवर अडलेलं,

चार जागांवर घासाघीस सुरूच,

देवळी, सावनेर, मान - खटाव, बेलापूर या जागांवर अंतिम टप्प्यात चर्चा
,
तोडगा निघताच होणार युतीची घोषणा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यावेळी विधानसभेच्या रिंगणात असणार,

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही
,
परवा मुंबईत युतीची घोषणा होण्याची शक्यता
,
भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार
शिवसेनेची पहिली यादी जाहीर
संभाव्य उमेदवारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्मचे वाटप
मुंबई : नारायण राणेंच्या प्रवेशाचा मुहुर्त अखेर ठरला, 2 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता गरवारे क्लब येथे करणार भाजपमध्ये प्रवेश, सूत्रांची माहिती
जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक संपली, पुढील दोन दिवसात आघाडीची अधिकृत घोषणा होईल : बाळासाहेब थोरात
नाशिक : वीजेच्या धक्क्याने सासू आणि सूनेचा मृत्यू तर दोन मुलं गंभीर जखमी, नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौकातील घटना, सासू सोजाबाई केदारे आणि सून शिंदुबाई केदारे यांचा मृत्यू
शिर्डी : काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार,
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार, उद्या सकाळी 10 वाजता शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार
काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक सुरु, अजित पवार, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील ,रवी राणा बैठकीला उपस्थित, 5 -6 जागांचा तिढा सोडवला जाऊन आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज आठ तास बंद राहणार, 1 नोव्हेंबर ते 28 मार्च 2020 पर्यंत दुरुस्तीचे काम

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात, नवरात्रोत्सवासाठी राज्यभरातल्या देवींच्या मंदिरांना रोषणाई, भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनही सज्ज

2. शरद पवारांवरच्या गुन्ह्यामुळं व्यथित झाल्यानं राजीनामा, पक्षाची माफी मागताना पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक,बारामतीमधूनच विधानसभा लढणार

3. तिकीटवाटपावर आज मोदींच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार, तर मुख्यमंत्रिपदावर दावा करत उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचा पुनरुच्चार

4. ह्यूस्टन मोदी आणि यूएनमधील भाषणानंतर मोदींचं भारतात जंगी स्वागत, भाषणात मोदींकडून सर्जिकल स्ट्राईकची आठवण काढत जवानांना वंदन

5. जम्मू-काश्मीरमध्ये 12 तासांत 3 दहशतवादी हल्ले, भारतीय लष्कराकडून 6 दहशतवाद्यांचा खात्मा, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका

6. विविध कामांसाठी आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.