LIVE BLOG : शरद पवार दौरा रद्द करून अजित पवारांच्या भेटीला, तर पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्य़ा भेटीला
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
27 Sep 2019 11:47 PM
शरद पवार दौरा रद्द करून अजित पवारांच्या भेटीला, शरद पवार पुण्याहून मुंबईकडे निघाले, अजित पवारांची समजूत काढणार
अजित पवारांचे मोठे पुत्र पार्थ पवार सुप्रिया सुळेंना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी दाखल, सुप्रिया सुळेंना डेंग्यू झाल्यामुळं त्या विश्रांती घेताहेत, आत्याची विचारपूस करण्यासाठी पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या घरी
शरद पवारांच्या निवासस्थानी हालचालींना वेग ,
राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल
राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल
खेळ माझा: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोहम्मद अझरुद्दीन यांची निवड
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शहर जिल्ह्यात एकही नामांकन दाखल नाही,
विधानसभा निवडणूकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. आज मुंबई शहर जिल्ह्यातील दहाही विधानसभा क्षेत्रातून एकही नामांकन दाखल झालेले नाही.
विधानसभा निवडणूकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. आज मुंबई शहर जिल्ह्यातील दहाही विधानसभा क्षेत्रातून एकही नामांकन दाखल झालेले नाही.
रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून उद्या भाजप प्रवेश
शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी ईडी प्रकरणी शरद पवारांना जो त्रास झाला, त्याची नैतीक जबाबदारी म्हणून अजित पवार यांनी राजीनामा दिला असावा, अजित पवारांचे निकटवर्तीय आमदार सतिश चव्हाण यांचं वक्तव्य
पुण्यात पावसाने हाहा:कार माजवल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पाहणीसाठी दाखल झाले. मात्र, अरण्येश्वर सोसायटीत चंद्रकांत पाटलांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पाटील हे फक्त फोटोसाठी आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय
मी स्वतः राज्यात गृहखात्याची परिस्थिती सांभाळली आहे, माझ्या एखाद्या निर्णय़ाने सामान्य माणसाला त्रास होऊ नये, म्हणून तूर्तास मी ईडी कार्यालयात जाणार नाही : शरद पवार
मी ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलिस आयुक्तांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी तूर्तास चौकशीची गरज नाही, ईडीकडून शरद पवारांना पत्र,
कदाचित भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही : ईडी
कदाचित भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही : ईडी
ईडीकडून शरद पवारांना ई-मेल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक शरद पवारांना टार्गेट करत आहे. सत्ताधाऱ्यांकडून सुडाचं राजकारण सुरु आहे : राहुल गांधी
मुंबई-ठाणे इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा खोळंबा,
आनंदनगर जकातनाक्यावर पोलिसांची नाकाबंदी,
ठाण्यातही वाहतुकीची मोठी कोंडी
आनंदनगर जकातनाक्यावर पोलिसांची नाकाबंदी,
ठाण्यातही वाहतुकीची मोठी कोंडी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याची पोटनिवडणूक लढण्याची शक्यता,
काँग्रेसच्या पहिल्या यादीत चव्हाण यांचं नाव नसणार,
चव्हाण यांना काँग्रेस हायकमांडने पोटनिवडणूक लढण्यास सांगितले
काँग्रेसच्या पहिल्या यादीत चव्हाण यांचं नाव नसणार,
चव्हाण यांना काँग्रेस हायकमांडने पोटनिवडणूक लढण्यास सांगितले
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने य़ा परिसरात जमावबंदी आदेश जारी केला आहे. जमावबंदी आदेशानुसार य़ा परिसरात पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
नोटीस नसतानाही कथित शिखऱ बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार आज दुपारी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार, मात्र ईडीचे अधिकारी शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. जेव्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल तेव्हाच यावं असा संदेश शरद पवारांना देण्यात येणार असल्याचं कळतंय. तरी, ईडी कार्यालयाबाहेर मुंबई पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर तिकडे पवार ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याने आज सातारकरांनी सातारा बंदचं आवाहन केलं आहे.
पार्श्वभूमी
- नोटीस नसतानाही शिखर बँक प्रकरणी शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार, ईडी कार्यालयाबाहेर जमावबंदी लागू, ईडीचे अधिकारी पवारांची समजूत काढणार, सूत्रांची माहिती
- अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पवारांसोबत हजर राहणार,कार्यकर्त्यांना मात्र मुंबईत न येण्याचं पवारांचं आवाहन मात्र कार्यकर्ते येण्यावर ठाम
- दिल्लीतल्या बैठकीनंतरही जागावाटपाबाबत कोणताही निर्णय नाही, सूत्रांकडून माहिती, अमित शाहांच्या उपस्थितीत 9 तास दिल्लीत खलबतं
- पीएमसी खातेदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा, एक हजारऐवजी 10 हजाराची रक्कम काढण्याची मुभा, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्त
- काळवीट शिकार प्रकरणी सलमानला आज जोधपूर जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याचा कोर्टाचा इशारा
- पंजाब सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हल्ल्याची भीती, सीमेवर हायअलर्ट, एलओसीवरची गस्त वाढवली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -