LIVE UPDATE | जनसुराज्य शक्तीचे नेते आणि आमदार डॉ. विनय कोरेंचा भाजपला पाठिंबा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Oct 2019 10:52 PM
मध्य रेल्वेच्या टीसीला मारहाण, काल रात्री 11 च्या सुमारास घडली घटना, टीसी एस के सिंग गंभीर जखमी , सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी तपास केला सुरू
जनसुराज्य शक्तीचे नेते आणि शाहूवाडी येथून निर्वाचित आमदार डॉ. विनयकुमार कोरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला.
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटीसह जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, काही भागातील वीज पुरवठाही खंडित
अमरावती : घरासमोर उभ्या असलेल्या भाजप नगरसेवक तुषार भारतीय यांच्या गाडीची अज्ञाताकडून तोडफोड, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांचे भाऊ आहेत तुषार भारतीय, हल्ल्यात गाडीचे काच फोडले आणि हल्लेखोर पसार
हिंगोली : भाऊबीजसाठी बहिणीला आणण्यासाठी गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू, सावन शुभाष बोलवार असं मृत तरुणाचं नाव, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील घटना
अंबरनाथ : गुडविनप्रकरणी अंबरनाथमध्येही गुन्हा दाखल, 48 तक्रारदारांनी केली 2.21 कोटींच्या फसवणुकीची तक्रार, गुडविनच्या मालकांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भाऊबीजच्या मुहूर्तावर सत्ता स्थापनेसाठी पहिली चर्चा होणार

, आज शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता
जालन्यात चोरट्यांनी चक्क एटीएममच पळवून नेल्याची घटना घडली आहे. जुना जालना भागातील नुतन वसाहतमध्ये असलेलं महाराष्ट्र बँकेचे दोन एटीएम मशीन होत्या. यापैकी एक मशीन चोरट्यांनी पळवल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे. त्याचबरोबर एटीएम पळवून नेताना चोरट्यांनी एटीएम केंद्रात प्रचंड तोडफोड केली आहे. एटीएममध्ये किती रक्कम होती हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र चोरी पहाटे 2 ते 3 सुमारास झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान एटीएम चोरीच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मुंबई : थकीत कर्ज घोटाळ्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या पीएमसी बँकेच्या खातेदरांच्या आंदोलनाला सुरुवात, रिझर्व्ह बँकेंसमोरच्या ऑफिससमोर आंदोलन सुरु

आयसीसीने काळ्या यादीत समावेश केलेल्या एका बुकीशी दूरध्वनीवर संभाषण केल्याप्रकरणी बांगलादेशचा अष्टपैलू शकिब अल हसन अडचणीत, या प्रकरणात शकिब अल हसनवर दीड वर्षांच्या बंदीची कारवाई होण्याची शक्यता, परिणामी शकिब बांगलादेश संघाच्या आगामी भारत दौऱ्याला मुकावं लागणार
जालन्यात महाराष्ट्र बँकेचं एटीएम चोरट्यांनी पळवलं, जुना जालना भागातील नुतन वसाहतमधील घटना, एटीएममध्ये किती रक्कम होती अद्याप कळू शकलं नाही, पोलीस तपास सुरु
न्यायमूर्ती शरद बोबडे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त होणार,
विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार
अपक्ष आमदार महेश बालदी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपा सरकारला आपला पाठिंबा जाहीर
औरंगाबाद लासुर पोटुल रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याने रेल्वेसेवा विस्कळीत.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. सत्तास्थापनेपूर्वीच सामनातील टीकेवरुन भाजप-शिवसेनेत तणाव, टीका थांबली तरच चर्चा करु, भाजपची शिवसेनेसमोर अट, तर भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या दौऱ्याबाबतही अनिश्चितता

2. एकनाथ खडसे राजकीय जीवनातील अनेक पदर उलगडणार, आत्मचरित्र लिहीणार, तर पक्षाकडून न्याय मिळण्याचीही आशा

3. संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही, काँग्रेस नेते सत्यजित तांबेंचा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना सल्ला

4. पंकजा मुंडेंना पराभूत होऊनही मंत्रीपद मिळण्याची शक्यता, भाजपच्या गोटात हालचाली सुरु, सूत्रांची माहिती

5. बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक विमानसेवेला सुरुवात, पहिल्या विमानातून पुण्यासाठी 15 जणांनी तर परतीच्या प्रवासावेळी 38 जणांचा प्रवास

6. गुडविन प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवणार, डोंबिवली पोलिसांची माहिती, 69 जणांच्या 3.87 कोटींची फसवणुकीची तक्रार

7. देवेंद्र फडणवीसांऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री करा, काँग्रेस नेते आशिष देशमुखांची मागणी

8. दिवाळीतही उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, नाशिकमध्ये पावसामुळे रस्ते तुंबले, बीड आणि जालन्यात गारपीट, हिंगोलीत पिकांचं मोठं नुकसान

9. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीची नोटीस, इक्बाल मिर्ची प्रकरणात कुंद्रा अडचणीत, 4 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

10. गेल्या 15 वर्षात मुंबईमध्ये सर्वात कमी ध्वनीप्रदूषण, आवाज फाऊंडेशनचा अहवाल, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाला कमी प्रदूषणाची नोंद

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.