LIVE UPDATE | काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Oct 2019 10:40 PM
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील त्राल परिसरात आज सायंकाळी सुरक्षाबल आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी 'जैश..'च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तीनपैकी दोन दहशतवादी विदेशी असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोल्हापुरात आढळला मोठा बॉम्बसाठा, माले मूडशिंगी गावात आढळले 69 गावठी बॉम्ब, दोघांना अटक,

उजळाईवाडी उड्डाणपुलाखालील स्फोटाचा तपास करत असताना पोलिसांना मिळाला मोठा बॉम्बसाठा
,
शिकारीसाठी बॉम्ब वापरत असल्याची आरोपींची माहिती

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील बसस्थानकासमोर पीकप आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन यूवकांच्या मृत्यू झाला आहे. तिन्ही युवक गांगलवाडी तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील असून आपल्या दुचाकीने गोंदियाकडे शैक्षणिक कामासाठी जात होते.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील बसस्थानकासमोर पीकप आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन यूवकांच्या मृत्यू झाला आहे. तिन्ही युवक गांगलवाडी तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील असून आपल्या दुचाकीने गोंदियाकडे शैक्षणिक कामासाठी जात होते.
LIVE BLOG : पीएमसी ग्राहकांचं शिष्टमंडळ आणि आरबीआय अधिकाऱ्यांसोबतची बैठक संपन्न, पीएमसीप्रकरणी 30 ऑक्टोबरला आरबीआय पत्रकार परिषदेत निर्णय देणार, मुंबईतल्या आझाद मैदानात पीएमसी खातेदारांचं आंदोलन सुरु
पुणे : शिक्षा अॅकॅडमीच्या चालकांकडून विद्यार्थ्यानींचे लैंगिक शोषण होत असल्याचा पालकांचा आरोप, पालकांकडून प्राध्यापकाची धुलाई, घटनेकडे पोलिसांचं दुर्लक्ष, सिंहगड रोडवरील अभिरूची मॉल पोलीस स्टेशन समोरील शिक्षा अॅकॅडमीमधील घटना
यापुढची कोणतीही निवडणूक लढवणार नाही, आमदार हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषदेत घोषणा
यापुढची कोणतीही निवडणूक लढवणार नाही, आमदार हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषदेत घोषणा
मुंबई : वरळीतील मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी इक्बाल मिर्चीच्या सहकाऱ्याला अटक, हुमायूं मर्चंट नावाच्या व्यक्तीला मुंबईतून अटक
सातारा : आंधळी धरण नऊ वर्षानंतर भरले, आंधळी धरण भरल्यामुळे माणगंगा नदीला पूर, नदी काठची घरे खाली करण्यास सुरुवात, लोकांना सतर्कतेचा इशारा, सातारा-सोलापूर रस्ता बंद, गोंदावले, दहिडी येथील मुख्य पुलावर पाणी
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरुम आणि मतमोजणी केंद्राला जॅमर बसवा, दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघामधून मुख्यमंत्र्यांविरोधात लढणाऱ्या आशिष देशमुख यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियाकडून रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी धुव्वा, भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 133 धावांत गुंडाळला, तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली
अहमदनगर : मुळा धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 1100 क्यूसेस वेगाने पाणी मुळा नदीत सोडण्यात आले

पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. 220च्या आसपास जागा जिंकत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, एबीपी- सीव्होटरचा एक्झिट पोल, सेनेच्या जागांमध्ये वाढ तर महाआघाडीला 60च्या आसपास जागा

2. महाराष्ट्रात सरासरी 60 टक्के मतदान, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक तर ठाण्यात सर्वात कमी मतदान, सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद

3. विजयाच्या विश्वासासह सत्ताधारी नेत्यांचं मतदान, तर परिवर्तनाच्या निर्धारासह विरोधकांनी दाबलं ईव्हीएमचं बटण, दिग्गजांची धाकधूक वाढली

4.औरंगाबादेत जलील समर्थक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले, अमरावतीत स्वाभिमानीच्या उमेदवारावर गोळीबार, जालन्यात दोन गटात धक्काबुक्की

5. बॉलिवूडच्या स्टार्सनी बजावला मतदानाचा हक्क, सचिननं केलं वृद्ध मतदारांचं कौतुक, आमटे, बंग, पुरंदरे आणि संभाजी भिडेंचंही मतदान

6. रांची कसोटीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर; फॉलोऑननंतर दक्षिण आफ्रिकेची आठ बाद १३२ अशी अवस्था, भारताला विजयासाठी केवळ दोन विकेट्सची गरज

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.