LIVE BLOG : कधी नाही ते गृहमंत्री झाले, शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Oct 2019 08:09 PM
2014 च्या जाहीरनाम्यात भाजपने म्हटलं होतं की, सहकाराला बळकट करण्यासाठी आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी विशेष कायदा आणू आणि जी पीएमसी बँक बुडली त्यावर भाजपचे नेते आहेत आणि सिटी को.ऑप. बँकेवर शिवसेनेचे नेते. आणि हेच नेते भ्रष्टाचार दूर करण्याच्या गप्पा मारतात : राज ठाकरे
2014 च्या जाहीरनाम्यात भाजपने म्हटलं होतं की, सहकाराला बळकट करण्यासाठी आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी विशेष कायदा आणू आणि जी पीएमसी बँक बुडली त्यावर भाजपचे नेते आहेत आणि सिटी कॉऑप बँकेवर शिवसेनेचे नेते. आणि हे गप्पा मारतात भ्रष्टाचार दूर करण्याच्या
शिवसेना-भाजपच्या जाहिराती पहा, सगळीकडे लिहिलंय 'हीच ती वेळ' म्हणजे गेली 5 वर्ष यांच्याकडे वेळ नव्हता का? : राज ठाकरे
पैशाचं काम अडलं की, शिवसेना नेते राजीनामा देण्याची धमकी द्यायचे : राज ठाकरे
पाच वर्षात राजीनामे देता आले नाहीत, नुसत्या धमक्या दिल्या, पैशाचं काम अडलं की राजीनाम्याची धमकी, राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका
औरंगाबाद : उशीर झाल्यामुळे अमित शाह यांची सभा रद्द,
अंधार पडल्याने हेलिकॉप्टर टेक ऑफ करु शकले नाही.
कधी नाही ते गृहमंत्री झाले, मोदींच्या मागे मागे राहून संधी मिळाली, शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल

सय्यद रिजवान सय्यद फिरोज, शेख साजिद शेख शफीक, वसीम शहा इरफान शहा, शेख तौफिक शेख रफिक अशी मृतकांची नावे
बुलडाणा : चिखली येथील जांबुवंती नदीत बुडून चार जणांचा मृत्यू, चिखलीच्या सैलानीनगर जवळील पोहण्यासाठी गेल्याला चार तरुणांचा बुडून मृत्यू
पिंपरी-चिंचवड विधानसभेतील पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ, काही महिला आणि पुरुषांकडून घोषणाबाजी, नेमकी काय घोषणाबाजी झाली हे स्पष्ट नाही, पण सभेत घोषणाबाजी झाली ते कार्यकर्ते नेमके कोणाचे होते हे समजू शकलेले नाही, भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी ही सभा सुरू आहे
मुंबईतील ग्रांटरोडच्या ड्रीमलँड सिनेमाजवळील शांतीनिकेतन बिल्डिंगला आग, सकाळी सहा वाजताची घटना, अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा आणि पाण्याचे सहा टँकर घटनास्थळी दाखल, अग्निशमन दलाकडून आग विजवण्याचे प्रयत्न सुरु, प्रचंड धूर झाल्याने आग विझवण्यात अग्निशमन दलाला अडचणी

पार्श्वभूमी

 




    1. विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा सुपरसंडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या सभांचा धडाका, तर अमित शाह, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरेंचाही झंझावात



 




    1. हिम्मत असेल तर भुजबळांचं नाव घ्या, बाळासाहेबांच्या अटकेसंदर्भात कबुली देणाऱ्या अजितदादांना उद्धव ठाकरेंचं आव्हान, तोंडी परीक्षेनंतर राजकीय महाभारत



 




    1. नितेश राणेंविरोधात प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे कणकवलीत जाणार, तर 15 ऑक्टोबरला राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा



 




    1. पैलवानावरील टीकेवरुन शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना हातवारे करत प्रत्युत्तर, भाजपचा तीव्र आक्षेप, तर काहीच गैर नसल्याचं राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण



 




    1. सलग बाराव्या वर्षी मुकेश अंबानी भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्जकडून भारतातल्या कुबेरांची यादी जाहीर, देशातल्या कोट्यधीशांची संख्याही वाढली



 




    1. स्पर्धकांनी एकच बेड शेअर करण्याच्या संकल्पनेवरुन बिग बॉस अडचणीत, अहवालानंतर मालिका बंद करायची की नाही हे ठरवणार, जावडेकरांची माहिती



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.