LIVE BLOG : व्यवस्थेविरुद्ध लोकांना राग का येत नाही? राज ठाकरेंचा सवाल

\'आज दिवसभरात\' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Oct 2019 09:53 PM
आमच्याकडे राम होता, भाजपमध्ये जाऊन त्याचा रावण झाला,
राज ठाकरेंचा आमदार राम कदमांना टोला
बहुमत आलं की माज वाढतो, तो माज कमी करायचा आहे : राज ठाकरे
महाराष्ट्रात तीन भाषा आहेत, चौथी भाषा आणाल तर बांबू बसेल : राज ठाकरे (अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंचा गुजराती भाषेला आणि मोदी-शाहांना विरोध)
विरोधी पक्षच नसेल, तर अन्यायाला वाचा कशी फुटणार? राज ठाकरेंचा सवाल, त्यामुळे माझा पक्ष विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसेल, असा विचार करुन मतदान करा, राज ठाकरेंचं आवाहन
मला या सरकारवर अंकुश ठेवायचा आहे, त्यासाठी माझा पक्ष विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसेल, यासाठी मतदान करा : राज ठाकरे
भाजपने पाच वर्षात अडीच लाख कोटींचं कर्ज काढलं : राज ठाकरे
व्यवस्थेविरुद्ध लोकांना राग का येत नाही? राज ठाकरेंचा सवाल
गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु सरकारला त्याचं काही नाही, अमित शाह महाराष्ट्रातल्या एका सभेत बोलत असताना त्या सभेच्या शेजारच्या गावात त्याच वेळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि अमित शाह बोलत होते कलम 370 बद्दल : राज ठाकरे
भांडुपमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा लाईव्ह
मुख्यमंत्र्यांच्या हॅलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात, मोठा अनर्थ टळला, मुख्यमंत्री सुखरुप
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची तस्करी होत आहे. याविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या अमली विरोधी पथकाने मोहीम सुरु केली आहे. बुलडाण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका बसमधून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून 105 किलो गांजा जप्त केला. तसेच प्रवीण सुपडा, राहुल चव्हाण, आशीष यादव यांना चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसमधून पकडले. या 105 किलो गांजाची किंमत आठ लाख ८० हजार ईतकी आहे.
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील नवेगाव आरोग्य उपकेंद्रात प्रशिक्षित नर्स नसल्याने दोन जुळ्या नवजात मुलींच्या मृत्यू, गावातील सुमन सोनुले नामक गर्भवती बाळंतपणासाठी झाली होती दाखल, प्रशिक्षित नर्स गैरहजर असल्याने प्रभारी नर्सने केली शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतर नवजात मुलींचा झाला मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यानंतर गावात संतापाची लाट, मुलींचे शव रुग्णालयात ठेवून ग्रामस्थांचे आंदोलन, कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उदयनराजे भोसले यांची कराड येथे भेट घेतली. अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे गेलेल्या उदयनराजेंना भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर उदयनराजेंनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कराड दक्षिणचे भाजपचे उमेदवार अतुल भोसले उपस्थित होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पुढील दोन दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्यामुळं पिंपरीत आज होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवर पावसाचे सावट आहे. आज रात्री 8 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय.
सोलापूर : सोलापुरात काँग्रेसला आणखी एक धक्का,

महिला जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा यांचा राजीनामा
,
तिकीट नाकारल्याने निष्ठावंताची कदर होत नसल्याचा आरोप
राहुल गांधी 15 ऑक्टोबर रोजी विदर्भात तीन आणि एक पश्चिम महाराष्ट्रात एक सभा घेण्याची शक्यता, विदर्भात चंद्रपूर, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात सभा होणार, पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सभा होणार
शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या भेटीला
फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वरती प्रचार केल्यामुळे बारा ग्रुप अॅडमिन आणि सहा उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता भंगाचा नोटिसा नांदेडमधील घटना

पार्श्वभूमी

1. सत्तेसाठी नव्हे तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मनसेला मत द्या, स्वतःचा आवाका ओळखलेल्या राज ठाकरेंचं आवाहन, सरकारनं न्यायालयाशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप

2. युती सडली मग सेना 124वर का अडली, उद्धव ठाकरेंना लक्ष करताना राज ठाकरेंचा सवाल, ईडी चौकशी आणि कलम-370 च्या मुद्यावरुनही हल्लाबोल

3. महाराष्ट्रात 222 जागा जिंकत  काँग्रेसचा विक्रम मोडण्याचा शाहांचा निर्धार, बालाकोटमध्ये कारवाईसाठी सैनिक गेले होते की मोदी? पवारांचा खोचक सवाल

4. मुंबईत पीएमसी खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न, तर आरबीआय गव्हर्नरसोबत चर्चा करत समस्या सोडवण्याची सीतारमन यांची ग्वाही

5.जिओनं फ्री आऊट गोईंग सेवा बंद केल्यानंतर वोडाफोन आयडियाकडून फ्री कॉलिंगची घोषणा, कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ग्राहकांची चांदी

6. बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 77वा वाढदिवस, महानायकावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव, मुंबईतील बंगल्याबाहेरही उत्साह

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.