LIVE UPDATE : सलमान खानच्या गोराईतील बंगल्यावरुन वाँटेड गुन्हेगाराला अटक
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
09 Oct 2019 10:02 PM
सलमान खानच्या बंगल्यावरून वाँटेड गुन्हेगाराला अटक, सलमानच्या गोराईतील बंगल्याचा केअर टेकर सिद्धेश्वर राणा जबरी चोरी आणि मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी, गेल्या 15 वर्षांपासून राणा सलमानच्या बंगल्यावर कार्यरत
कल्याण : कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंडखोरीची धार वाढली, शिवसेनेचे 26 नगरसेवक आणि 300 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, पक्षप्रमुखांनी युतीधर्म पाळण्याचा आदेश दिल्याने शिवसैनिकांची भूमिका, पक्षप्रमुखांना आमच्यामुळे कमीपणा घ्यावा लागू नये यासाठी पक्षाचा राजीनामा देत असल्याची भूमिका, शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणू आणि पक्षप्रमुखांना भेट देऊ, कल्याण पूर्वेतील शिवसैनिकांची भावना
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीला धक्का, माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, अभिषेक कळमकर राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकरांचे पुतणे, अभिषेक कळमकर यांनी नगर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मागितली होती उमेदवारी
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीला धक्का, माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, अभिषेक कळमकर राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकरांचे पुतणे, अभिषेक कळमकर यांनी नगर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मागितली होती उमेदवारी
गडचिरोली : चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण दलममधील माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, सात माओवाद्यांवर 33 लाख 50 हजारचं बक्षीस, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली पोलिसांना मोठं यश
पुण्यातली राज ठाकरेंची नियोजित सभा पावसामुळे रद्द
पुण्यातली राज ठाकरेंची नियोजित सभा पावसामुळे रद्द
प्रायोगिक रंगभूमीचे आधारस्तंभ आणि 'आविष्कार' या प्रायोगिक नाटकांना वाहिलेल्या संस्थेचे संस्थापक सदस्य अरुण काकडे यांचं मुंबईत निधन झालं. अरुण काकडे हे हे 50 हून अधिक वर्षे रंगभूमीवर कार्यरत होते. 94 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अमका हे आत्मचरित्र लिहिलं. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
सोलापुरात मुसळधार पावसाला सुरूवात,
परतीच्या पावसाची सोलापुरात जोरदार हजेरी
,
सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
नाशिक : येवला मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का, विश्वासू सहकारी असलेल्या माणिकराव शिंदे यांचा शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ, 1 जुलैपासून वाढीव भत्ता लागू होणार, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
हार्बर लाईन विस्कळीत, पनवेलला जाणारी लोकल रखडली, गाड्या 10 ते 15 मिनिटे उशीराने, पेंटाग्राफला आग लागल्याने लोकल उशीराने
राहुल गांधी १३ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार, सुरत कोर्टातील हजेरीनंतर राहुल गांधी महाराष्ट्रात येणार, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा
पार्श्वभूमी
१. अत्य़ाधुनिक लढाऊ विमान राफेल भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात, भारताच्या पहिल्या राफेलमधून संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची गगनभरारी, पारंपारिक पद्धतीनं पूजन
(( पहिलं राफेल भारताच्या ताफ्यात ))
२. तिकीट न मिळालेल्यांची उद्धव ठाकरेंकडून जाहीर माफी, दसरा मेळाव्यात शिवसेनेचा जाहीरनामा, अवघ्या 35 मिनिटांत आटोपलं भाषण
३. मनसेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, कोथरुडचे मनसेचे उमेदवार किशोर शिंदेंसाठी सरस्वती मैदानात राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा
४. दसरा मेळाव्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर, धुळ्यात मुख्यमंत्री, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे तर अकोल्यात शरद पवारांची आज प्रचारसभा
५. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष थकलेत, विधानसभेच्या तोंडावर सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान, विलिनीकरण गरजेचं असल्याचं मत
६. अफगाणिस्तानात भारताविरोधात कट रचणाऱ्या मैलाना आसिमचा खात्मा, अलकायदाच्या इंडियन सबकॉन्टिनेंट चीफला संपवल्याची अफगाणिस्तानच्या सुरक्षा निर्देशकांची पुष्टी