LIVE UPDATE | अंबरनाथमध्ये मनसेच्या उमेदवारावर मारहाणीचा गुन्हा दाखल
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 Oct 2019 11:52 PM
मुंबई : कळव्याच्या सम्राट अशोक नगरमध्ये उघड्या वायरमुळे शॉक लागून दोघांचा मृत्यू, नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी,
अंबरनाथमध्ये मनसेच्या उमेदवारावर मारहाणीचा गुन्हा दाखल, रामदास आठवले यांना धक्काबुक्की करणाऱ्या तरुणाकडून गुन्हा दाखल, न्यायालयाच्या आदेशाने तब्बल 10 महिन्यांनी गुन्हा, राजकीय षडयंत्र असल्याचा मनसे उमेदवाराचा आरोप
ठाणे : शहापूर तालुक्यातील धोबिपाडा परिसरात वीज कोसळून एका अल्पवयीन मुलासह दोन बैलांचा मृत्यू, आकाश तुळशीराम ठोंबरे असं मृत मुलाचं नाव
जालना : माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे कार्यकर्ते संजू अंभोरे यांची हत्या, बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील घटना
ईडीने ताब्यात घेतलेला स्वत:चाच बंगला भाड्यावर घेण्यासाठी डीएसकेंची हायकोर्टात याचिका, दरमहा 3 लाख भाडे देण्याची कुलकर्णींची तयारी मात्र तपासयंत्रणेला हवेत दरमहा 11 लाख
कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष, शिवसेना राणेंच्या विरोधात लढण्यावर ठाम, भाजपचे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सामंत यांची माघार नाही
कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष, शिवसेना राणेंच्या विरोधात लढण्यावर ठाम, भाजपचे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सामंत यांची माघार नाही
हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदार संघातूनं माजी खासदार शिवाजी माने आणि माजी आमदार गजानन घुगे यांची माघार, भाजपमधून बंडखोरी करत केली होती अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढतीची शक्यता, महायुतीकडून संतोष बांगर, महाआघाडीकडून संतोष टारफे, वंचित बहुजन आघाडी करून अजित मगर रिंगणात
वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, विल्यम जी केलिन ज्युनिअर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्झा या तीन वैज्ञानिकांना पुरस्कार
वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, विल्यम जी केलिन ज्युनिअर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्झा या तीन वैज्ञानिकांना पुरस्कार
नागपूर : रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशिष जयस्वाल हे बंडखोरीवर कायम,
भाजपचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विरोधात केली आहे आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी
जयदत्त धस यांचा उमेदवारी अर्ज मागे, सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता सुरेश धस हे भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचाक करणार
नागपूर - नागपूर उत्तरमधून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज सांगोळे यांची माघार, काँग्रेस अधिकृत उमेदवार नितीन राऊत यांना दिलासा
मराठा क्रांती मोर्चा प्रमुख संजीव भोर राष्ट्रवादीत , शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश
माढा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व बंडखोरांनी घेतली माघार, आता मुख्य लढत राष्ट्रवादीचे बबन शिंदे आणि शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्यात रंगणार
नांदगाव : माजी आमदार संजय पवार यांनी नांदगाव मतदारसंघामधून घेतली माघार, जिप सदस्य जे.डी पवार यांनीही माघार घेतली, शिवसेनेचे नगरसेवक गणेश धात्रक यांची माघार
येवला मतदार संघातून छगन भुजबळ यांच्या विरोधात बंडखोरी करणारे माणिकराव शिंदे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली
पंढरपूर मतदारसंघातील शिवसेना बंडखोर उमेदवार शैला गोडसे यांनी घेतली माघार, परिचारकांना दिलासा
औरंगाबाद- फुलंब्री मतदार संघात भाजप उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे,
तसेच औरंगाबाद मध्य मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील भाजप शहर अध्यक्ष किशनचंद तनवाणींचा अर्ज मागे
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट देवळी विधानसभा मतदारसंघात युतीत बंडखोरी कायम, आघाडीतील बंडखोरी शमली, राष्ट्रवादीतील सुधीर कोठारी यांनी माघार घेतली
- देवळी विधानसभा मतदारसंघातून भाजपा जिल्हाध्यक्ष बंडखोर राजेश बकाने अपक्ष म्हणून रिंगणात, देवळीची जागा शिवसेनेला सुटल्याने बकाने नाराज
- हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर अशोक शिंदे अपक्ष म्हणून रिंगणात
सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बंडखोरी कायम
,
दिलीप माने यांना सेनेने तिकिट दिल्याने महेश कोठे अपक्ष म्हणून लढणार
,
मातोश्रीवरुन आलेल्या नेत्यांच्या आदेशाला धुडकावत कोठे यांची बंडखोरी
,
शहर मध्य मधून शिवसेनेच्या दिलीप माने यांच्या अडचणी कायम
नांदगाव मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि नियोजन समितीच्या सभापती मनीषा पवार यांची माघार मात्र त्यांचे पती रत्नाकर पवार यांची बंडखोरी कायम, नांदगाव मतदार संघात चौरंगी लढत होणार
नांदेड : भोकरमध्ये उमेदवारांची प्रचंड संख्येने माघार, 91 पैकी 84 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार, भोकरमध्ये होते तब्बल 134 उमेदवार, त्यापैकी 91 ठरले होते पात्र उमेदवार, त्यातील 84 जणांनी घेतली आज माघार, आता निवडणूक मैदानात सातच उमेदवार.
भोसरी विधानसभेत सर्वपक्षीय भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांना घेरणार असल्याची सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीसह मनसे आणि शिवसेना अपक्ष उमेदवार विलास लांडेंना पाठिंबा देणार, तर राष्ट्रवादीचे दुसरे बंडखोर दत्ता साने अर्ज मागे घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना जाहीर पाठींबा, इंदापुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यामान सभापती आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप , अशोक घोगरे , भाऊसाहेब सपकल यांचा हर्षवर्धन पाटील यांना जाहीर पाठिंबा
सोलापूर : 'आप'चे उमेदवार ऍड. खतीब वकील यांना जीवे मारण्याची धमकी, ऍड. खतीब वकील यांना पत्राद्वारे निवडणुकीतून माघार घेण्यासाठी धमकी
,
खतीब वकील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली तक्रार, पोलिसात दाखल करणार गुन्हा
बीड : सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांचा उमेदवारी अर्ज मागे, भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांचं काम करणार
ठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार नाही, सुहास देसाई यांचा उमेदवारी अर्ज मागे, मनसे उमेदवार अविनाश जाधव यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा
नांदगाव मतदार संघातील भाजपाचे बंडखोरी केलेले माजी आमदार संजय पवार यांची माघार
औरंगाबाद पूर्व मधून शिवसेनेचे रेणुकादास वैद्य यांनी घेतली माघार, तर औरंगाबाद मध्य मधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला
सोलापूर - सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज माघार
करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांची निवडणुकीतून माघार,
अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना जाहीर केला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचा उद्यापासून निवडणूक प्रचाराचा दौरा, दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आठ ते दहा ऑक्टोबरपर्यंत शरद पवारांचा दौरा, आठ ऑक्टोबर - अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, पारोळा, नऊ ऑक्टोबर - अकोला जिल्ह्यातील बाळापूर, वाशिम जिल्ह्यातील मानोरा - कारंजा, दहा ऑक्टोबर- हिंगणघाट, बुटीबोरी- हिंगणा, काटोल
पंतप्रधानांच्या सभा कुठे कुठे :
13 ऑक्टोबर-
जळगाव आणि विदर्भातील साकोली,
16 ऑक्टोबर-
अकोला, परतूर, पनवेल ,
17 ऑक्टोबर-
परळी, सातारा, पुणे
,
18 ऑक्टोबर -
मुंबई
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वात प्रसिध्द वाघीण असलेली माया वाघीण आहे तिची आई, मृतक वाघीण अंदाजे दोन वर्ष वयाची, ताडोबा तलाव परिसरात आज सकाळी आढळला मृतदेह
बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, याठिकाणी 370 कलम रद्द केल्यामुळे 370 तोफांची सलामी आणि 370 झेंडे लावूल स्वागत केले जाणार
अमित शाहांची प्रचाराची पहिली सभा औस्यामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या पीएंसाठी किल्लारीत सभा
नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यासाठी मोठा दिलासा
,
मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या येलदरीत 9.17% पाणीसाठा
साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजपा उमेदवार राज्यमंत्री परिणय फुके यांना रविवारी एका सभेदरम्यान तेली समाजातील लोकांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले नागपूरचा पार्सल वापस जावो, परिणय फुके मुर्दाबाद असे नारे यावेळेस संतप्त तेली समाजाच्या लोकांनी लावले, लोकांचा वाढलेला उद्रेक पाहून परिणय फुके यांनी तिथून काढता पाय घेतला.
नंदुरबार : सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा कोंडाईबारी घाटात ट्रक आणि रिक्षाचा अपघात, पंधरा जण जखमी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीच्या निमित्ताने पुण्यातील कोथरुडमध्ये शस्त्र पूजन आणि संचलनाचं आयोजन
पहाटे पायी चालत प्रणिती शिंदे यांनी घेतलं देवीचं दर्शन,
नवरात्री निमित्त सोलापुरात प्रणिती शिंदे यांनी रुपाभवानी देवीचं दर्शन घेतलं
नागपूर : चोरीच्या संशयातून जमावाने मनोरूग्ण तरूणास मारहाण केली, कळमेश्वर तालुक्यातील ब्राम्हणी फाटा येथे ही मारहाण करण्यात आली
पार्श्वभूमी
1. आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचं पत्र, सरन्यायाधीशांकडून विशेष दाखल
2. विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, प्रचार सोडून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचा बंडोबांशी फोनवरुन संवाद, भाजपसमोर 27 मतदारसंघात 144 बंडखोरांचं आव्हान
3. राज ठाकरेंच्या पहिल्यावहिल्या सभेसाठी पुण्यात मैदान मिळेना, सभेच्या जागेसाठी मनसेचे शर्थीचे प्रयत्न, अलका चौकात सभा घेण्याचा मनसेचा इशारा,
4. महात्मा गांधींच्या अस्थी चोरुन फोटोखाली 'गद्दार' लिहिले, तुषार गांधींना अश्रू अनावर
5. नोकरी-धंद्याची स्थिती आणखी बिकट होण्याची भारतीयांना भीती, आरबीआयच्या सर्वेक्षणादरम्यान नोंदवलं मतं, तर पुढच्या वर्षी स्थिती सुधारण्याची अनेकांना आशा
6. भुसावळमध्ये अंधाधुंद गोळीबारात 5 जणांची हत्या, भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या परिवारावर अज्ञातांचा गोळीबार, 3 संशयित ताब्यात