भुसावळ : आंबेडकर नगर येथे नगरसेवकांच्या कुटुंबावर अज्ञातांचा गोळीबार, तीन जणांचा मृत्यू

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Oct 2019 11:39 PM
भुसावळ : आंबेडकर नगर येथे नगरसेवकांच्या कुटुंबावर अज्ञातांचा गोळीबार, तीन जणांचा मृत्यू , एका जणांची प्रकृती गंभीर, जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु
येत्या 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, हवामान विभागाचं आवाहन
नवी दिल्ली : आरे वृक्षतोड प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रानंतर सुनावणी होणार


रत्नागिरीत परतीच्या पावसाची हजेरी, अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, भातशेतीला फटका बसण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच फारुख अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट, मागील दोन महिन्यांपासून फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला नजरकैदेत
नवी मुंबई : प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीमधील घटना
मुंबई :आरे आंदोलनात अटक झालेल्या सर्व 29 जणांना बोरिवली कोर्टाकडून जामीन मंजूर, प्रत्येकी सात हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन
जालना : सावरगाव भागडे येथे शेतात वीज पडून तिघांचा मृत्यू, दोन जण जखमी, मृतांमध्ये दोन महिला

एमएमआरसीने संपूर्ण मुंबईत 24 हजार झाडं लावलीत, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा दावा, ट्विटमध्ये व्हीडिओच्या माध्यमातून केला दावा, आरे मिल्क कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ओसाड परिसरात झाडं लावल्याची माहिती

एमएमआरसीने संपूर्ण मुंबईत 24 हजार झाडं लावलीत, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा दावा, ट्विटमध्ये व्हीडिओच्या माध्यमातून केला दावा, आरे मिल्क कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ओसाड परिसरात झाडं लावल्याची माहिती
#BREAKING | विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाचा अफ्रिकेवर दणदणित विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी
गेल्या तीन दिवसापासून बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कूपर हॉस्पिटल मुंबई येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या मुलांना राहण्यासाठी वसतीगृह नसल्याने संप पुकारला आहे. मुलांना हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शेजारी राहावे लागत आहे. मुलांना स्वाइन फ्लूच्या वार्ड शेजारी राहावे लागत आहे.
अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा, तर याआधी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध केला आहे.
भिवंडी शहरातील जकात नाका परिसरात एका दुचाकीस्वाराचा कारला किरकोळ टक्कर झाल्याने जोरदार राडा
पुणे : मध्यरात्री 1.30 वाजता पर्वती पायथा, सानेगुरुजी शाळेसमोर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये 11 गाड्यांना आग, 6 दुचाकी आणि 1 रिक्षा पूर्ण जळाल्या, 4 दुचाकींना आगीची झळ, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
कवठेमंकाळ तालुक्यातील अग्रणी नदीत बापलेक वाहून गेले, योगेश पवार आणि त्याची 6 वर्षांची मुलगी श्रेया पवार असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

पार्श्वभूमी

 




    1. आरेतील वृक्षतोडीला स्थानिकांचा तीव्र विरोध, जितेंद्र आव्हाडांसह अनेकांची धरपकड, 55 जणांविरोधात पोलिसात तक्रार, मोठा पोलिस फौजफाटा तैनात



 




    1. चंद्रशेखर बावनकुळेंवर पूर्व विदर्भाच्या प्रचाराची जबाबदारी, तिकीट नाकारल्यानंतर नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न



 




    1. महायुतीतील मित्रपक्षांना भाजपनं जागा दाखवली, उद्धव ठाकरेंचा चिमटा, तर कमी जागा मिळाल्यानं रामदास आठवलेंकडून खंत



 




    1. मुख्यमंत्री फडणवीसांचा उमेदवारी अर्ज वैध, नोटरीच्या मुदतीबद्दलचा आक्षेप फेटाळला , विखे खोतकरांनाही आयोगाचा दिलासा



 




    1. विधानसभेसाठी काँग्रेसला उर्मिला मातोंडकरांची आठवण, उमेदवारांच्या प्रचाराला येण्याचं साकडं, दोन दिवसांत उर्मिला निर्णय कळवणार



 




    1. विशाखापट्टणम कसोटीचा आजचा पाचवा दिवस, रोहित शर्माचं दुसऱ्या डावातही दमदार शतक, भारताला विजयासाठी 9 विकेटसची आवश्यकता



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.