LIVE UPDATE | नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले, वीज कोसळून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Oct 2019 10:48 PM
नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले, वीज कोसळून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, इगतपुरी तालुक्यातील भरत भले, हिराबाई सदगीर तर दिंडोरी तालुक्यातील यमुनाबाई गांगोडे यांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले, वीज कोसळून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, इगतपुरी तालुक्यातील भरत भले, हिराबाई सदगीर तर दिंडोरी तालुक्यातील यमुनाबाई गांगोडे यांचा मृत्यू
उमेदवारी नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नियुक्ती
राधाकृष्ण विखे पाटलांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध असल्याचा शिर्डी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय, काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेला आक्षेप

यवतमाळ : गांजा तस्करी साठी एसटी बसचा वापर, यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पिंपळखुटी नाक्यावर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाकडून एसटी बसमधून 30 किलो गांजा जप्त, या प्रकरणी तेलंगणा राज्यातील तीन जण ताब्यात

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंच्या गाडीला पनवेलजवळ अपघात, एकवीरा देवीच्या दर्शनावरुन परतत असताना दुर्घटना, शर्मिला ठाकरेंना किरकोळ दुखापत
कोल्हापूर : केवळ हिंदुत्ववादाचा विचार देशासाठी घातक,
सर्व धर्मियांचा सन्मान करणं गरजेचं : शरद पवार
जुन्या सांगवीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गोळीबार. सुदैवाने गोळी न लागल्याने तो बचावला. राजकिरण घुटे असं त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. किरकोळ वादातून ही घटना घडल्याचा सांगवी पोलिसांची माहिती. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू.

पार्श्वभूमी

1. हायकोर्टाच्या आदेशानंतर मध्यरात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड, पोलिसांकडून आंदोलक पर्यावरणप्रेमींची धरपकड, आदित्य ठाकरेंचाही वृक्षतोडीला तीव्र विरोध

2. मित्रपक्षही कमळाच्या चिन्हावर 12 जागा लढणार, मुख्यमंत्र्यांकडून फॉर्म्युला जाहीर, सेनेशिवाय बहुमत गाठण्याचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

3. बंडखोरांना जागा दाखवून देऊ, संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा इशारा, अर्ज मागे घेण्यासाठी बंडखोरांना 2 दिवसांचा अल्टिमेटम

4. तावडे, बावनकुळे, मेहता आणि पुरोहितांचा पत्ता कट, तिकीट न मिळाल्यानं मेहता समर्थकांचा राडा, तर खडसेंऐवजी कन्या रोहिणी यांना उमेदवारी

5. उमेदवारी अर्ज दाखल करताना नेत्यांचं शक्तिप्रदर्शन, नागपुरात मुख्यमंत्री, बारामतीत अजितदादा, येवल्यात भुजबळ, शिर्डीतून राधाकृष्ण विखेंचा शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज

6. भारताविरोधात पाकिस्तानचं नवं षडयंत्र, काश्मीर मुद्द्यावर पीओकेवासियांचा एलओसीवर मार्च काढणार, हिंसा झाल्यास भारताची बदनामी करण्याचा डाव

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.