LIVE UPDATE | आरे मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्यास सुरुवात
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 04 Oct 2019 10:34 PM

पार्श्वभूमी
1. विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्य़ाचा आज शेवटचा दिवस, शक्तिप्रदर्शन करत नागपुरातून मुख्यमंत्री तर बारामतीतून अजित पवार अर्ज भरणार2. उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्यानं एकनाथ खडसे आक्रमक, आज सकाळी 11 वाजता भूमिका स्पष्ट...More
1. विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्य़ाचा आज शेवटचा दिवस, शक्तिप्रदर्शन करत नागपुरातून मुख्यमंत्री तर बारामतीतून अजित पवार अर्ज भरणार2. उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्यानं एकनाथ खडसे आक्रमक, आज सकाळी 11 वाजता भूमिका स्पष्ट करणार, कार्यकर्त्यांना जमण्याचं खडसेंचं आवाहन3. चार उमेदवारांची भाजपची तिसरी यादी जाहीर, खडसेंसह तावडे आणि बावनकुळेही वेटिंगवर, प्रकाश मेहता, बाळासाहेब सानप, राज पुरोहितांचंही नाव नाही4. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, प्रचारात सहभागी होणार नाही, संजय निरुपम यांचं विधान, तर काँग्रेस सोडण्याचाही सूचक इशारा5. अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा सेनेत प्रवेश, मध्यरात्री शिवबंधन बांधलं, कळवा-मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाडां विरोधात लढणार6. पीएमसी बँक घोटाळाप्ररकरणी HDIL च्या दोन संचालकांना अटक, बँकेत ४ हजार ३३५ कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड, तर खातेधारकांना 25 हजार रुपये काढता येणार
मुंबई : आरे परिसरातील मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्यास सुरुवात, आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात