LIVE BLOG : कल्याण पश्चिमेत भाजप आमदारांची बंडखोरी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
02 Oct 2019 10:25 PM
भाजपची दुसरी यादी जाहीर, यादीत एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांचं नाव नाही. केजमधून नमिता मुंदडांना उमेदवारी तर गोपीचंद पडळकर बारामतीतून लढणार
भाजपची दुसरी यादी जाहीर, खडसे, तावडे, बावनकुळे यांचं नाव नाही
कल्याण पश्चिमेत भाजप आमदारांची बंडखोरी, शिवसेनेला जागा सोडल्याने अपक्ष निवडणूक लढणार :
ठाणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पश्चिम मतदारसंघात भाजप आमदारांनी बंडखोरीची घोषणा केली आहे. ही जागा शिवसेनेला सोडल्यानं भाजपनं बंडाचा पवित्रा घेतला आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघात 2014 साली भाजपचे नरेंद्र पवार आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र यंदा ऐरोलीच्या मोबदल्यात भाजपनं कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेला सोडली. त्यामुळं नाराज भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्षाला आज दुपारपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. मात्र याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आज विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केली आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंचं नाव नाही, सूत्रांची माहिती, खडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चा, खडसेंच्या कन्येला तिकीट मिळण्याची शक्यता
शिवसेना पुणे शहर एकही विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला न आल्याने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांची नाराजी
आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीत राष्ट्रवादीतून सुरेश माने यांना उमेदवारी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील मातोश्रीवर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार
नागपूर : नागपूर दक्षिण विधानसभा मतदासंघात नाराजी नाट्य सुरूच, उमेदवारी नाकारल्या गेलेल्या आमदार सुधाकर कोहळेंचे समर्थक रस्त्यावर, रिंग रोडवर उदयनगर चौकात निदर्शने सुरू, रस्ता रोकोचा प्रयत्न
चंद्रपूर : वरोरा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना लढत देण्यासाठी नवी खेळी, तीन टर्म आमदार राहिलेल्या माजी मंत्री संजय देवतळे यांना शिवसेनेकडून उमेदवारी, गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर झाले होते दोन हजाराने पराभूत, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला, थोड्याच वेळात मातोश्रीवर बांधणार शिवबंधन
राजू शेट्टी शिरोळमधून निवडणूक लढवण्याची शक्यता, शेकाप आणि डाव्या आघाडीच्या लोकांनी केली मागणी
वर्धा : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरी, माजी आमदार, राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे उद्या अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार, भाजपकडून विद्यमान आमदार समीर कुणावार यांना उमेदवारी, शिंदेंच्या बंडखोरीने भाजपाला फटका बसण्याची शक्यता
नवी मुंबई : संदीप नाईक यांच्या ऐवजी ऐरोली विधानसभेतून गणेश नाईक उभे राहणार, गणेश नाईक ऐरोली विधानसभेत भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती
नवी मुंबई : संदीप नाईक यांच्या ऐवजी ऐरोली विधानसभेतून गणेश नाईक उभे राहणार, गणेश नाईक ऐरोली विधानसभेत भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती
सोलापूर : दक्षिण सोलापुरातील एमआयएमचा उमेदवार बदलला, सोफिया शेख यांच्याऐवजी अमित आजनाळकर यांना उमेदवारी, सोफिया शेख यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उमेदवार बदलल्याची माहिती
नितेश राणे यांचं भाजपच्या यादीत नाव पक्कं, कणकवली देवगडमधून नितेश राणे यांना उमेदवारी, दुस-या यादीत नितेश राणे याचं नाव जाहीर होणार, चार तारखेला नितेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुख्यमंत्री नितेश राणेंसाठी कोकणात सभेला जाणार
INDvsSA 1st Test : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
पार्श्वभूमी
१. 125 उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, खडसे, तावडे वेटिंगवर, आज दुसरी यादी जाहीर होणार
२. उमेदवारी न मिळाल्यानं मुंबई, सातारा, नागपूर, परभणी, नांदेडसह ठिकठिकाणी बंडाळी, कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करताना दरेकरांचा संताप अनावर
३. विधानसभेसाठी ५२ उमेदवारांची काँग्रेसची उमेदवारी जाहीर, कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, गोरेगावमधून युवराज मोहितेंना उमेदवारी जाहीर
४. विधानसभेसाठी मनसेची पहिली यादी, 27 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब, मुंबई, ठाणे आणि नाशकातले उमेदवार जाहीर, वरळीतून अद्याप उमेदवार नाही
५. मशाल महोत्सवानिमित्तं प्रतापगड उजळला, यंदा 359 मशाली पेटवल्या, गडावर फटाक्यांचीही आतषबाजी
6. राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 150वी जयंती, दिग्गजांकडून गांधींना आदरांजली तर देशभरात स्वच्छता अभियानाद्वारे श्रद्धांजली अर्पण करणार