LIVE BLOG : भाजप-१४४, शिवसेना-१२६, मित्रपक्ष-१८ महायुतीच्या जागावाटपाच्या आणखी एका फॉर्म्युल्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Sep 2019 09:25 PM
सलमान खान Black Bug Case : हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याचा कोर्टाचा इशारा काळवीट हत्याप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ
भाजप-१४४, शिवसेना-१२६, मित्रपक्ष-१८
महायुतीच्या जागावाटपाच्या आणखी एका फॉर्म्युल्याची राजकीय वर्तुळात चर्चा!
पीएमसी बँकेतून आता 10 हजार रुपयापर्यंत पैसे काढण्याची मुभा, रिझर्व बँकेचे आदेश
वीज कोसळून पाच जण ठार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडामधील घटना
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमान शेतकरी संघटनेला धक्का, 'स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीसोबत येरळा, अग्रणी, माणगंगा नद्यादेखील दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जत तालुका सोडता जिल्ह्यातील सर्व भागात आल्हादायक चित्र पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडामार्ग, वैभववाडीत मुसळधार पाऊस दुपारपासून सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार 350 मी.मी. नोंद झाली आहे. वाऱ्यासह तळकोकणात मुसळधार पाऊस पडत असल्याने भातशेतीचे नुकसान होत आहे.
नगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, बाबूर्डी बेंद परिसरात पहाटेच्या सुमारास झाला अपघात, 4 जण जागीच ठार
पुरंदर तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून कऱ्हा नदीला पूर, नाझरे धरणातून पन्नास हजार क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात, कऱ्हा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
पुणे : पुण्यात ढगफुटी, मुसळधार पावसाने अरण्येश्वर परिसरात भिंत कोसळली, विविध घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू, सिंहगड रोड परिसरात मध्यरात्रीपासून वीजपुरवठा खंडित, अतिवृष्टीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. पुणे शहरासह परिसरात अतिवृष्टीचा कहर, मुसळधार पावसामुळे पुण्यात नऊ जणांचा मृत्यू, तर वाहनं आणि अनेक घरांचंही नुकसान

2. अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह हवेली, भोर, पुरंदर, बारामतीमधल्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती तर पुढील ५ दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा, वीजपुरवठ्यावरही परिणाम

3. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही, ईडीच्या कारवाईनंतर शरद पवारांचं थेट आव्हान, पवारांच्या समर्थनात राज्यभर राष्ट्रवादीचं आंदोलन

4. नवी मुंबईतल्या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंकडून युतीचे स्पष्ट संकेत, सरकार युतीचच येणार असल्याचाही दोन्ही नेत्यांचा दावा, जागावाटपावर मात्र मौन

5. काँग्रेसला आलेली मरगळ झटकण्यासाठी राहुल गांधी निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार, गांधी जयंतीला वर्ध्यातून पदयात्रा, प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता

6. देशातल्या नऊ बँका बंद करण्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण, खातेदारांनी घाबरण्याचं कारण नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.