LIVE BLOG : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची एक्सप्रेस सेवा कोलमडली
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.i
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. विधानसभेच्या तोंडावर शरद पवार, अजित पवारांच्या अडचणीत वाढ, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा, आज बारामती बंदची हाक
2. दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे सरकार कारवाई करतंय, शरद पवारांचा आरोप, तर कुठल्याही बँकेचा कधीही संचालक नसल्याचंही पवारांकडून स्पष्ट
3. युतीसाठी भाजपकडून शिवसेनेला 122 जागांसह विधान परिषदेच्या 3 जागा, सूत्रांची माहिती, आज नवी मुंबईत माथाडी मेळाव्यात उद्धव-फडणवीस एकाच व्यासपीठावर
4. सर्व व्यवहार बंद करत पीएमसीवर आरबीआयकडून निर्बंध, दिवसाला केवळ एकच हजार काढता येणार, संताप करत ग्राहकांचा बँकांमध्ये गोंधळ
5. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सीनेसृष्टीतला सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांसह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
6. 5.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानं पाकिस्तानसह उत्तर भारत हादरला, पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू, 19 जणांचा मृत्यू
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -