LIVE BLOG : जम्मू-काश्मीर, चंदीगड, दिल्लीसह पाकिस्तानात भूकंपाचे धक्के
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
मुंबईतल्या खार रोड पश्चिममध्ये इमारतीचा भाग कोसळला आहे, तर काही भाग झुकल्याची माहिती मिळतेय. खार रोड क्रमांक 17 वरील पूजा अपार्टमेंटचा भाग कोसळला आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. खार पश्चिम येथील पुजा इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला असून ही इमारत एका बाजूला झुकली आहे
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. शिवसेना-भाजप युतीची आज घोषणा होण्याची शक्यता, जागावाटपाबाबत रात्री वर्षा बंगल्यावर 4 तास खलबतं, भाजप आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार
2. युतीबाबत आणखी एक नवा फॉर्म्युला, भाजपचा 115 जागांचा प्रस्ताव तर शिवसेना 125 जागांवर ठाम, 10 जागांवर घोडं अडल्याची सूत्रांची माहिती
3. माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, ह्यूस्टनमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं कौतुक करणारं ट्वीट, मोदींकडूनही प्रतिसाद
4. आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांच्या हेतूवर संशय उपस्थित करणारी कागदपत्र 'एबीपी माझा'च्या हाती, मुख्यमंत्र्यांकडूनही विरोधकांच्या मनसुब्यावर सवाल
5. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामजन्मभूमीच असल्याचं मुस्लीम पक्षकारांना मान्य, मात्र पूर्णपणे बेदखल न करण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती
6. जम्मू-काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी तयार, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -