- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG : हाऊडी मोदी । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी थोड्याच वेळात संबोधित करणार
LIVE BLOG : हाऊडी मोदी । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी थोड्याच वेळात संबोधित करणार
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
22 Sep 2019 10:34 PM
हाऊडी मोदी । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात संबोधित करणार
कझाकस्तानमधील जागतिक कुस्ती स्पर्धेत मराठमोळ्या पैलवान राहुल आवारेची ऐतिहासिक कामगिरी, अमेरिकन पैलवानानाला नमवत कांस्यपदकाची कमाई, जागतिक कुस्तीत पदकविजेता पहिला महाराष्ट्रीय पैलवान
कझाकस्तानमधील जागतिक कुस्ती स्पर्धेत मराठमोळ्या पैलवान राहुल आवारेची ऐतिहासिक कामगिरी, अमेरिकन पैलवानानाला नमवत कांस्यपदकाची कमाई, जागतिक कुस्तीत पदकविजेता पहिला महाराष्ट्रीय पैलवान
पालघर : डहाणू तलासरी तालुक्यातील भाग पुन्हा भूकंपाचे धक्के, गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा धक्के बसायला सुरुवात शुक्रवारी तीन झटके, शनिवारी एक धक्का आणि आज 12.47 वाजता पुन्हा मोठा धक्का बसला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमची दुसरी यादी जाहीर
- अॅड. शंकर सरगार (सोलापूर सांगोला )
- फारुख मखबुल शाब्दी (सोलापूर मध्य )
- सोफिया तोफिक शेख (सोलापूर दक्षिण)
- हिना शफिक मोमीन (पुणे कॅंटोनमेंट )
प्रहार संघटनेने अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. विधानसभेच्या तोंडावर ही भेट महत्वाची मानली जात आहे. आघाडीचा मित्रगट असलेल्या प्रहार संघटनेला फोडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याची चर्चा आता रंगलीय.
उदयनराजे भोसलेंच्या भाजप प्रवेशानंतर पवार पहिल्यांदाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात
औरंगाबाद : उस्मानाबाद येथील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड, औरंगाबादमध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय
नवी मुंबई : नवी मुंबई परिवहनच्या बस कंडक्टरला मारहाण, पैशांवरुन झालेल्या वादात प्रवाशाने कंडक्टरच्या मानेवर प्लेडने वार केले, कोपरखैरणे येथील शनिवारी रात्रीची घटना, प्रवाशाविरोधात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
मुंबई : लाल रक्त चंदन तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, जवळपास 15 कोटींचा रक्त चंदन जप्त, घोडबंदर रोड आणि भेंडी बाजार येथे गुन्हे शाखा युनिट 9 ची कारवाई , एका आरोपीला अटक
राज्यात सरासरीपेक्षा 32 टक्के अधिक पाऊस, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, वाशीम आणि हिंगोली या सहा जिल्ह्यांमध्ये पावसाला सरासरी गाठता आली नाही
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 21 ऑक्टोबरला मतदान, तर 24 ऑक्टोबरला निकाल, इच्छुकांची धाकधूक वाढली
2. स्वतंत्र लढल्यास भाजप बहुमताजवळ तर महायुतीसह लढल्यास 200 पार, ओपिनियन पोलचा अंदाज, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आघाडीवर
3. पितृपक्षानंतरच युतीची घोषणा, सूत्रांची माहिती, तर अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर, उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता
4. सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत नाही, निवडणूक आयोगाची माहिती, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या उदयनराजेंना धक्का
5. भारतातून ऑस्करसाठी गली बॉयची एन्ट्री, अंधाधून, आर्टिकल-15 आणि तमिळ सिनेमा सुपर डिलक्सला मागे टाकत गली बॉयची सरशी
6. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टनमध्ये दाखल, आज अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बैठक, हाऊडी मोदी कार्यक्रमातही ट्रम्प सहभागी होणार