LIVE BLOG : पालघर : भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू, शुक्रवारी चार धक्के तर आज 3 .2 रिश्टरस्केलचा धक्का

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Sep 2019 11:44 PM
नाशिक शहरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार, गळती थांबवणे, देखभाल दुरुस्तीसाठी मनपा पाणी पुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा बंद, रविवारच्या पाणी पुरवठ्यावरही होणार परिणाम
पालघर : भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू, शुक्रवारी चार धक्के तर आज 3 .2 रिश्टरस्केलचा धक्का,

डहाणू, तलासरी तालुके पुन्हा हादरले
औरंगाबादमध्ये दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू, शुभम वाहुल,अक्षय त्रिभुवन अशी मृत मुलांची नावे, कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा गावातील घटना
दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, महाराष्ट्र, हरियाणाच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता
कुलाबा, मस्जिद आणि भायखळा परिसरासह दक्षिण मुंबईत 25 ते 26 पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, भंडारवाडा जलकुंभाच्या तपासणी करण्याचे काम महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे

कोल्हापूर : 25 तारखेला अंबाबाईचे दर्शन बंद, मंदिरातील मुख्य गाभारा बंद राहणार, अंबाबाई मंदिरात नवरात्रीची तयारी सुरु, येत्या बुधवारी मुख्य गाभार्‍याची स्वच्छता केली जाणार

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर

1. विधानसभा लढवण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आग्रह, निर्णय मात्र राज ठाकरे घेणार, तर मनसे 100 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती

2. मुख्यमंत्रीच शिवसेनेची यादी देणार असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंकडून लोकसभेच्या फॉर्म्युल्याची आठवण, नरेंद्र मोदींच्या टोल्यालाही प्रत्युत्तर

3. माझाच्या कॅम्पेननंतर सरकार कामाला, ठाणे-नवी मुंबईतील खड्डेभरणी सुरु, तर अभिनेता वैभव मांगलेकडून खड्ड्यांवर विडंबन

4. लहान हॉटेल्ससाठी जीएसटी रद्द, कॅटरिंगच्या जीएसटीमध्येही कपात, मात्र कॅफिनेटेड ड्रिंकवरचा जीएसटी 18 वरून 28 टक्क्यांवर

5. मंदीवर उतारा म्हणून अर्थमंत्र्यांकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात, गुतंवणूकदारांची तासाभरात 5 लाख कोटींची कमाई

6. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना, ह्यूस्टनमध्ये मुसळधार पावसामुळे हाऊडी मोदी कार्यक्रमावर पावसाचं सावट

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.