LIVE UPDATE | मनसे विधानसभा निवडणूक लढवणार : सूत्र
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 20 Sep 2019 07:08 PM
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.inमहत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर1. मुंबईच्या अनेक भागातून गॅस गळतीच्या तक्रारी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, अग्निशमन, महापालिका अधिकारी घटनास्थळी2. बहुमत नसतानाही स्थिर सरकार चालवून दाखवलं, युतीचं घोडं अडलेलं असताना नाशिकमध्ये मोदींचं सूचक विधान, तर राममंदिरावरून टीका करणाऱ्यांना बडबोल्यांची उपमा3. 22 सप्टेंबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर, नारायण राणेंसह रखडलेले भाजपप्रवेश उरकण्याची शक्यता, शाहांच्या युतीसंदर्भातल्या भूमिकेकडेही लक्ष4. मनसे विधानसभा लढणार की नाही याचा अद्याप सस्पेन्स, राज ठाकरेंच्या नेतृत्वात आज बैठक तर काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता5. वंचितशी घटस्फोट घेणाऱ्या एमआयएमकडून पुन्हा मनोमिलनाचे संकेत, जागांची तडजोड झाल्यास आघाडी शक्य, जलिल यांची भाषा बदलली6. मुंबईतल्या खड्ड्यांवरुन आरजे मलिष्काचे पुन्हा गाण्यातून फटकारे, मुंबईतल्या रस्त्यावर चंद्र उतरल्याचं म्हणत महापालिकेची खिल्ली
दिल्लीत निवडणूक आय़ोगाची बैठक संपली, महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आणि तारखांसंदर्भात चर्चा, आज निवडणुकांची घोषणा होणार नाही