शरद पवार यांच्या घरी प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली, बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, अजित पवार उपस्थित होते, बैठकीनंतर अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, आम्ही विरोधी पक्षात बसणार
मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर नाराज शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सत्तास्थापनेसाठी जोरदार चर्चा सुरु , भाजपला दूर ठेवण्यासाठी दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता, हालचालींना वेग, सूत्रांची माहिती
ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचं वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन, त्यांच्या जाण्याने साहित्यक्षेत्रात नक्कीच पोकळी निर्माण होणार आहे. गिरिजा कीर यांची शंभरपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित आहेत. कथा-कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य, आत्मचरित्र अशा विविध साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला होता.
पुणे : राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार, पुण्यासह राज्यातील अनेक भागात पुढील 48 तास मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार, पुणे हवामान खात्याने वर्तवली शक्यता
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळदजवळ टायर फुटल्याने इर्टिगा आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात, अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
शरद पवार बुधवारी 6 नोव्हेंबरला परभणीतील सेलू तालुका आणि हिंगोलीतील वसमत तालुक्यांचा दौरा करणार, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी दौरा, सध्या राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मुंबई : शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड, शिवसेना आमदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, सुनील प्रभू शिवसेनेचे पक्षप्रतोद
मुंबई : शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड, शिवसेना आमदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, सुनील प्रभू शिवसेनेचे पक्षप्रतोद
शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेच कायम राहण्याची शक्यता आहे. याआधी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु गटनेते पदाचा अनुभव, राजकीय अभ्यास, पक्षातलं स्थान लक्षात घेऊन एकनाथ शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विधीमंडळ नेतेपद स्वीकारणार का याकडे लक्ष होतं. पण आता एकनाथ शिंदे यांचंच नाव अंतिम असल्याची चर्चा आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाख आजपासून देशातील दोन नवे केंद्रशासित राज्ये, लडाखमध्ये आर के माथुर यांनी उपराज्यपालपदाची शपथ घेतली. काही वेळात जम्मू-काश्मीरमध्ये गिरीश चंद्र मुर्मू देखील शपथ घेणार
जम्मू-काश्मीर आणि लडाख आजपासून देशातील दोन नवे केंद्रशासित राज्ये, लडाखमध्ये आर के माथुर यांनी उपराज्यपालपदाची शपथ घेतली. काही वेळात जम्मू-काश्मीरमध्ये गिरीश चंद्र मुर्मू देखील शपथ घेणार
आज सरदार पटेल यांची 144 वी जयंती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे देशात ठिकठिकाणी रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रन फॉर युनिटीला फ्लॅग ऑफ केला. दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममधून रन फॉर युनिटीला सुरुवात झाली.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
4. वीज अंगावर पडून राज्यभरात सात जणांचा मृत्यू तर अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, द्राक्षबागांचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
5. आजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये गिरीश चंद्र मुर्मू तर, लडाखमध्ये आरके माथुर पहिल्या उपराज्यपालपदाची शपथ घेणार
6. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त आज देशभरात रन फॉर युनिटीचं आयोजन, देशभरातील 700 हून अधिक जिल्ह्यांतील लाखो लोक सहभागी होणार