LIVE UPDATE | शिवसेनेच्या दोन महिला नेत्यांना ट्विटरवरुन धमकी, पोलिसात तक्रार दाखल

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Oct 2019 11:30 PM
शिवसेनेच्या दोन महिला नेत्यांना ट्विटरवरुन धमकी, शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे आणि उपनेत्या प्रियांका चर्तुर्वेदी यांना एका अज्ञात इसमाकडून धमकी, शितल म्हात्रे यांच्याकडून तात्काळ तक्रार दाखल
इकबाल मिर्चीसोबतच्या संबंधांप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा आज ईडी कार्यालयात 8 तासाहून अधिक काळ चौकशी झाली. इक्बाल मिर्ची अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा मानला जातो. मिर्चीसोबत राज कुंद्राचे व्यासायिक संबंध असल्याचा आरोप आहे.

राज्यात निवडणुकीसाठी सुरु असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर, 21 सप्टेंबर पासून राज्यात आचारसंहिता सुरु होती
अंबनेऴी घाटात एसटी 7 फूट दरीत कोसळता कोसळता वाचली., दैव बलवत्तर म्हणून 70 प्रवाशी बचावले, १२ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती
राज्यात वीज अंगावर पडून सात जणांचा मृत्यू, अमरावतीत तीन जण दगावले तर अकोल्यात चार जणांना जीव गमवावा लागला
अकोला : तेल्हारा तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे कापूस वेचण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू, मृतांमध्ये 12 वर्षीय मुलीचा समावेश, दोन जण जखमी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नवनिर्वाचीत सर्व आमदार, समर्थक प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष आमदारांची उद्या 31 ऑक्टोबरला बैठक, शिवसेना विधीमंडळ गटनेत्याच्या नावाची अधिकृत घोषणा होणार
राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड,
राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांकडून अजित पवारांच्या नावाला अनुमोदन
मुंबई : राष्ट्रवादीच्या कार्यालयात तुतारींच्या निनादात शरद पवारांचं जंगी स्वागत, निकालानंतर पहिल्यांदा पवार कुटुंबीय मुंबईत, थोड्याचं वेळात विधिमंडळ नेत्यांची निवड होणार
हिंगोली - वसमत तालूक्यातील सावंगी, ढऊळगाव, ब्राह्मणगाव, जवळा बाजार, हट्टा परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात.
बीड : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग येथील घटना, विकास ठोंबरे (24) आणि गणेश ठोंबरे (22) असं मृतांची नावे, साठलेल्या पाण्यात पडलेल्या लहान भावाला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचा मृत्यू

भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड, चंद्रकांत पाटील यांच्या प्रस्तावाला, सुधीर मुनगंटीवारांसह 11 आमदारांचं अनुमोदन, देवेंद्र फडणवीसच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड, चंद्रकांत पाटील यांच्या प्रस्तावाला, सुधीर मुनगंटीवारांसह 11 आमदारांचं अनुमोदन, देवेंद्र फडणवीसच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
भाजपने शिवसेनेला 13:26 फॉर्म्युल्याचा प्रस्ताव दिला आहे. या फॉर्म्युलानुसार शिवसेनेचे 13 मंत्री तर भाजपचे 26 मंत्री असतील. मुख्यमंत्रीपद, गृह, नगरविकास, अर्थ, महसूल सोडून इतर खात्यांवर चर्चा करण्याचा भाजपचा आग्रह आहे. तर उपमुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे नवनिर्वाचित आमदार विधीमंडळात दाखल,
विधीमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी बैठक
गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत आधी ठरवावरुन आणि नंतर फराळ न मिळल्यावरुन गोंधळ झाला.

खेड्यापाड्यातून आलेल्या सभासदांना अल्पोपहार न मिळाल्याने गोंधळ झाला.

या सभेसाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गगनबावडासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सभासद आले होते. परंतु
अल्पोपहार न मिळाल्याने उपाशीपोटी जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.

औरंगाबादामधील बजाजनगर इंद्रप्रस्थ कॉलनीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये घराचं तसंच साहित्याचं मोठं नुकसान झालंच पण शेजारच्या घराच्या भिंतीलाही भगदाड पडलं आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
कल्याणमध्ये एका व्यावसायिकावर अज्ञातांनी गोळीबार केला. मुदस्सर मजीद (गुड्डू) असं जखमी व्यावसायिकाचं नाव आहे. गुड्डू यांच्या हाताला आणि पायाला गोळी लागली आहे. काल रात्री वालधुनी परिसरात हा प्रकार घडला. बाईकवरुन आलेले दोन हल्लेखोर कोळसेवाडीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती आहे. गोळीबार का झाला? याचा तपास सुरु आहे. दरम्यान, गुड्डू यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई : भाजपच्या विधीमंडळ पक्षानेत्याच्या निवडीसाठी आज बैठक, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, नवनिर्वाचित आमदार उपस्थित राहणार

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर..

1. दिवाळीनंतर राज्यात राजकीय बैठकांचा सिलसिला, भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरणार पक्षनेता, राष्ट्रवादीच्या बैठकीतही विधीमंडळ नेत्याची निवड तर काँग्रेसचीही खलबतं

2. मुख्यमंत्रीपदाबद्दल फडणवीसांनी शब्द फिरवल्याने बैठक रद्द केल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट, तर सेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, मुनगंटीवारांचा पलटवार

3. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 1 किंवा 2 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरवण्याचं आव्हान

4. काँग्रेस हायकमांडकडून हवी तशी साथ न मिळाल्याने मोठं नुकसान, विरोधी पक्षनेते वड्डेटीवारांची 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यासमोर खंत, विदर्भातल्या नेत्यांवरही आसूड

5. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा, अनुचित प्रकार टाळण्यासाठी सत्ताधारी गटावर  खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ

6. परतीच्या पावसाचा कहर सुरुच, मराठवाड्यात सोयाबीन तर विदर्भात कापसाचं मोठं नुकसान, मनमाडमधल्या द्राक्षांच्या बागा झोपल्या, रब्बीच्या पेरणीलाही मोठा फटका

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.