LIVE UPDATE | श्रीनगर : लाल चौक इथे दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू, 12 जखमी
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 04 Nov 2019 08:18 PM

पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.inसकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर...1. शिवसेना-भाजपत दबावाचं राजकारण शिगेला, शिवसेना खासदार संजय राऊत आज राज्यपालांना भेटणार, शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचा संजय राऊतांचा दावा2. मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या शिवसेनेसाठी महसूल आणि अर्थ खातं सोडण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती, तर चर्चा फक्त मुख्यमंत्रिपदावरच होणार, सेना ठाम3. सोनिया गांधींसोबतच्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत दाखल, तर शेतकऱ्यांसाठी जादा मदत मागण्याच्या निमित्तानं फडणवीस शाहांना भेटण्याची शक्यता4. हेक्टरी २५ हजारांची नकसान भरपाई द्या, सरकारवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंची मागणी, तर शेतकऱ्यांसाठी लगेच सरकार स्थापन होणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया5. दिल्लीत आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू, नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना ४ हजारांचा दंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रीही नियम पाळणार6. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकणासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याकडून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा
शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी नवलखांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलेला दिलासा 12 नोव्हेंबरपर्यंत कायम