साताऱ्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा, उदयनराजेही सहभागी

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

पाहा मोर्चातील खास फोटो
राज्यभरात लाखोच्या संख्येने निघणाऱ्या विराट मोर्चांची राज्यासह देशात चर्चा सुरु आहे. प्रत्येक मोर्चा संख्येचे नवनवीन उच्चांक प्रस्तापित करत आहे.
उदयनराजे सुरुवातीपासूनच मराठा मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि हा अंदाज अचूक ठरला. सातारा अगदी भगवामय झाला होता.
कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.
मराठा मूकमोर्चाचं वादळ आज साताऱ्यात धडकलं. साताऱ्यातील शाहू स्टेडियमपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेदेखील या मोर्चात सहभागी झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -