भाजप स्वबळावर सत्तास्थापनेपासून 5 जागा दूर, एबीपी माझा सीवोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झालं आहे. अनेक दिग्गज मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शरद पवारांनी मुंबईत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात, अजित पवार यांनी बारामतीत तर राज ठाकरे यांनी मुंबईत मतदान केलं. सुरुवातीच्या दोन तासाच मतदारांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र दुपारनंतर मतदानाला काहीसा वेग आला आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 21 Oct 2019 08:57 PM

पार्श्वभूमी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (21 ऑक्टोबर) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही आज...More
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (21 ऑक्टोबर) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही आज पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसं काढायचं असं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तिकडे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोग, पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव सुरुळीत पार पडावा म्हणून 4 लाख पोलीस तर 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची फौज कामाला लागली आहे. तर तिकडे ज्यांचं राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे त्या उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. आज जवळपास पावणे नऊ कोटी मतदार सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
विभागनिहाय |
मुंबई: - महायुती-31 , महाआघाडी-04, अन्य-1
कोकण : - महायुती-32 , महाआघाडी-05, अन्य-02
मराठवाडा :- महायुती-28 , महाआघाडी-13, अन्य-6
पश्चिम महाराष्ट्र - महायुती-44, महाआघाडी-23, अन्य-3
उत्तर महाराष्ट्र :- महायुती-26, महाआघाडी-10, अन्य- 0
विदर्भ :- महायुती-49, महाआघाडी-08, अन्य-03
मुंबई: - महायुती-31 , महाआघाडी-04, अन्य-1
कोकण : - महायुती-32 , महाआघाडी-05, अन्य-02
मराठवाडा :- महायुती-28 , महाआघाडी-13, अन्य-6
पश्चिम महाराष्ट्र - महायुती-44, महाआघाडी-23, अन्य-3
उत्तर महाराष्ट्र :- महायुती-26, महाआघाडी-10, अन्य- 0
विदर्भ :- महायुती-49, महाआघाडी-08, अन्य-03