LIVE UPDATE | अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल, यकृताच्या आजारामुळे बिग बींवर दोन दिवसांपासून उपचार सुरु

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Oct 2019 11:19 PM
अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल, यकृताच्या आजारामुळे बिग बींवर दोन दिवसांपासून उपचार सुरु

ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रकाश आंबेडकर यांची अचानक भेट,

दोघेही आज सोलापुरात प्रचारासाठी आले होते
,
एकाच हॉटेलमध्ये थांबल्याने अचानक भेट झाली
भारत पेट्रोलियम कंपनीच्या खासगीकरणाचा घाट घातला जातोय : राज ठाकरे
मंदीचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार, अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांनी महाराष्ट्राला तसा इशारा दिला आहे : राज ठाकरे
महाराष्ट्रात रोजगार बंद पडत आहेत : राज ठाकरे
बँका बुडत आहेत, देशात मंदीची स्थिती आहे, सरकार यावर बोलायला तयार नाही : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रभादेवी येथील सभा सुरु

सरकारी शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या 21 ऐवजी 24 ऑक्टोबरपासून, निवडणुकांमुळे बदल, 11 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वेगळे पैलू इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात उलगडणार, महाराष्ट्र शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी व्यवस्थापक जॉय थॉमसला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर सुजीत सिंग अरोराला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी. 'कन्झ्युमर अॅक्शन नेटवर्क'ची याचिका हायकोर्टात सादर, 22 ऑक्टोबरला सुनावणी होणार. शुक्रवारी पीएमसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी
डहाणू विधानसभेतील भाजप बंडखोर उमेदवार रमेश मलावकर यांचे बंड थंड झालं आहे. मलावकर आज भाजप अधिकृत उमेदवार पास्कल धनारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या डहाणूतील सभेच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे.
डहाणू विधानसभेतील भाजप बंडखोर उमेदवार रमेश मलावकर यांचे बंड थंड झालं आहे. मलावकर आज भाजप अधिकृत उमेदवार पास्कल धनारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या डहाणूतील सभेच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे.
औरंगाबाद - कन्नडमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर भागातील घरावर अज्ञातांचा हल्ला, गाड्यांची तोडफोड, घरावर दगडफेक, मध्यरात्रीची घटना
औरंगाबाद - कन्नडमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर भागातील घरावर अज्ञातांचा हल्ला, गाड्यांची तोडफोड, घरावर दगडफेक, मध्यरात्रीची घटना
नैऋत्य मान्सूनचा पाऊस माघारी परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडं हवामान आहे. मात्र 18 ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात 19 ते 20 ऑक्टोबर दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं मतही हवामान तज्ज्ञांनी वर्तवलं आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे 'एबीपी माझा'च्या हाती, 122 जागांवर विजयाचं भाकित, तर परळीत मुंडे, वांद्र्यात शेलार, राम शिंदेंच्या कर्जत जामखेडमध्ये टफ फाईट

2. 15 नोव्हेंबरपर्यंत राममंदिर प्रकरणी अंतिम निकाल, 40 दिवसांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला, सुनावेळीवेळी कोर्टात नाट्यमय घडामोडी

3. पाठीत वार करणाऱ्यांपासून सावधान, कणकवलीत नारायण राणेंवर प्रहार करताना उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, तर निलेश राणेंची ट्वीटद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका

4. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज मुंडेंच्या परळीत, मुख्यमंत्र्यांच्या सहा तर उद्धव ठाकरेंच्या तीन सभा तर शरद पवार नाशिक जिल्ह्यात

5. जागावाटपात नमतं घ्यावं लागलेल्या शिवसेनेचा राज ठाकरेंकडून समाचार, नाशिकतल्या सभेत अनेकांची खिल्ली, नाशकातला पराभव जिव्हारी लागल्याची खदखद व्यक्त

6. बार्शीतील बंडखोर उमेदवार राजेंद्र राऊतांविरोधात गुन्हा, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांची तक्रार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.