LIVE UPDATE | विरारमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Oct 2019 11:09 PM
विरारमध्ये कोपरी परिसरातील नित्यानंद धाम या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, सहा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू, भूमी विनोद पाटील असं मृत मुलीचं नाव
मराठी उद्योजक महाराष्ट्र सोडून परदेशात जात आहेत : राज ठाकरे
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, बारावीची लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान तर दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च 2020 दरम्यान होणार
संकल्प पत्र नाही हे तर भाजपचे अपयशपत्र, पाच वर्षापूर्वीचे व्हिजन 2020 पुन्हा छापले असते तरी चालले असते, काँग्रेसच्या सचिन सावंत यांची टीका

काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेले नेते एकतर भाजपची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल, माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरी यांचं भाकित
सत्ताधाऱ्यांना मराठी कलाकारांचा विसर पडला आहे : राज ठाकरे
अयोध्या प्रकरणाची सुनावणी उद्या संपण्याची शक्यता, सरन्यायाधीशांकडून उद्या खटल्याची सुनावणी संपवण्याचे संकेत, सर्व पक्षकरांच्या वकिलांना उद्या युक्तीवाद संपवण्याचे निर्देश
कणकवलीत भाजपकडून नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणेंच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत दाखल, भाजप खासदार नारायण राणेंकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत, मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळी रवाना
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा ना राज्याला फायदा ना त्यांच्या पक्षाला : राज ठाकरे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एसपी कॉलेजच्या मैदानातील मोठमोठ्या झाडांची कत्तल, तर सुरक्षेच्या कारणास्तव झाडं कापल्याचा आयोजकांचा दावा
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एसपी कॉलेजच्या मैदानातील मोठमोठ्या झाडांची कत्तल, तर सुरक्षेच्या कारणास्तव झाडं कापल्याचा आयोजकांचा दावा
कल्याण-डोंबिवली शहराला 6500 कोटी रुपये देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे : राज ठाकरे
नाशिकमधील जागा भाजपला सूटल्याने शिवसेनेच्या 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांचा राजीनामा, नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणारे विलास शिंदे यांना पाठिंबा
नाशिकमधील जागा भाजपला सूटल्याने शिवसेनेच्या 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांचा राजीनामा, नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणारे विलास शिंदे यांना पाठिंबा
सुशिक्षित लोकांचं बकाल शहर ही डोंबिवली शहराची ओळख झाली आहे : राज ठाकरे
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची संख्या वाढली आहे. मालवणीतील प्रभाग क्रमांक 32 च्या नगरसेविका म्हणून शिवसेनेच्या गीता भंडारी यांना लघुवाद न्यायालयाने मान्यता दिली आहे. काँग्रेसच्या विजयी नगरसेविका स्टेफी किणी यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्यामुळे त्यांचं नगरसेवकपद रद्द झालं आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये मोठी कारवाई, तब्बल एक कोटींची रोकड जप्त, पाचपावलीतून 75 लाख तर सीताबर्डीतून 25 लाख हस्तगत

2. भाजपच्या संकल्पपत्राचं आज प्रकाशन तर नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत, तर भाजपचे दिग्गज नेतेही प्रचारात

3. उद्धव ठाकरे आज इस्लामपूर, कोल्हापूरमध्ये तर आदित्य ठाकरेंचे मुंबईत रोड शो, शरद पवारांचा सोलापूर, सांगली आणि पुण्यात दौरा

4. अयोध्या प्रकरणातील सुनावणीचे शेवटचे तीन दिवस, मुस्लीम पक्षाच्या युक्तिवादाला हिंदू पक्ष उत्तर देणार, अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

5. 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कर भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जी, इस्थर डफलो आणि मायकल क्रेमर यांना जाहीर, दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात केलेल्या संशोधनासाठी गौरव

6. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती निश्चित, तर अमित शाहांचे पुत्र जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी, राजीव शुक्लांची घोषणा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.