LIVE UPDATE | मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला बांबू भरलेल्या ट्रकची धडक, मुनगंटीवार यांच्यासह कारमधील सर्व सुरक्षित

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Sep 2019 11:06 PM
आदित्य ठाकरे यांना ग्रामीण महाराष्ट्रातून निवडणूक लढण्याचा राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांचा सल्ला,
प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर आदित्य ठाकरे उस्मानाबादमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण
चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला बांबू भरलेल्या ट्रकची धडक, मुनगंटीवार यांच्यासह कारमधील सर्वच सुरक्षित, बल्लारपूर येथील कार्यक्रम आटोपून पोंभुर्णा येथे जात असताना झाली घटना
आदित्य ठाकरे यांना ग्रामीण महाराष्ट्रातून निवडणूक लढण्याचा राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांचा सल्ला
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार,
उदयनराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षप्रवेश
माजी आमदार केशवराव आंधळे यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती,

शासनाने गोपीनाथराव मुंडे यांच्या नावांने ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा आदेश शासनाने निर्गमित केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली. पक्षांतरानंतर राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविरोधात केली होती याचिका

मुंबई : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी सहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर त्यांचा पक्षप्रवेश होईल.
मुंबई : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी सहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर त्यांचा पक्षप्रवेश होईल.
उदयनराजे आजच खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबत दिल्लीला जाऊन आज किंवा उद्या अमित शाह यांच्या उपस्थितीत खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती

भास्कर जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडून राजीनामा मंजूर, भास्कर जाधव आज शिवसेनेत प्रवेश करणार
भास्कर जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडून राजीनामा मंजूर, भास्कर जाधव आज शिवसेनेत प्रवेश करणार
उदयनराजेंनी भाजपची वाट पकडल्यानंतर रामराजे निंबाळकर शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामराजे शिवसेनेच्या संपर्कात होते. उदयनराजेंची भूमिका स्पष्ट न झाल्याने रामराजेंनी आपला निर्णय राखून ठेवला होता.

मुंबई : गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन, 22 तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप
मुंबई : गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन, 22 तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव राजीनामा देण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहे. भास्कर जाधव यांच्यासोबत शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित आहे. भास्कर जाधव थोड्याच वेळात राजीनामा देणार असून आज शिवबंधन हाती बांधणार आहेत.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं कृत्रिम तलावात विसर्जन झालं. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासह पुण्यातील गणपती विसर्जन संपन्न झालं आहे.
नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या ताब्यात असलेले काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचारांसाठी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भोपाळ : गणपती विसर्जनादरम्यान भोपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली. विसर्जनासाठी गेलेली बोट उलटून 11 जणांचा मृत्यू झाला. तर चार जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस, आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा, तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा तूर्तास सुरळीत

2. लालबागचा राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन, पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन तर पुढच्या वर्षी दहा दिवस लवकर बाप्पांचं आगमन

3. गणपती विसर्जनानिमित्त चांद्यापासून बांद्यापर्यंत ढोल ताशांचा गजर, नेत्यांनी धरला ठेका, मुख्यमंत्र्यांकडून बाप्पाचं पर्यावरणपूरक विसर्जन

4. लांबणीवर पडलेल्या उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला, 14 सप्टेंबरला दिल्लीत मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत हाती घेणार भाजपचा झेंडा

5. नागपुरात सुनील केदार आणि भाजप समर्थकांत जुंपली, तर परभणीत शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विसर्जन मिरवणुकीत वाद

6. सरकारकडून इशारा मिळताच पीओकेसंदर्भात कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज, पाक मंत्र्यांच्या दर्पोक्तीनंतर बिपीन रावतांचा इशारा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.